मुंबई(पंकजकुमार पाटील) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत शिवरत्न सेवा संघातर्फे मा.मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे व स्थानिक आमदार श्री सुनिल राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त मा.उपविभागप्रमुख श्री सुधाकर पेडणेकर व मा.शाखाप्रमुख श्री महेश पाताडे यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि २८ जुलै रोजी कांजुरमार्ग ( पुर्व)येथे केले होते. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भाषणातून शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या शिवरत्न सेवा संघाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेत त्यांच्या कार्याची स्तूती केली.
या कार्यक्रमास आमदार श्री सुनिल राऊत, खासदार श्री संजय पाटील, उपनेते श्री दत्ताजी दळवी, म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष श्री बाबा कदम, विभागप्रमुख श्री रमेश कोरगावकर, महिला विभाग संघटक सौ राजेश्वरी रेडकर, भारतीय कामगार सेना चिटणीस श्री संदिप राऊत, महिला संघटक सिद्धी जाधव, शाखाप्रमुख रविंन्द्र महाडिक, शाखाप्रमुख दिपक सावंत, श्वेता पावसकर, सुशिला मंचेकर, मनीषा जाधव, रजनी पाटील, संजिवनी तूपे, सुमन म्हसकर, मामा मंचेकर, लिना मांडलेकर, राजेश पावसकर, विजय तोडणकर, दत्ताराम पालेकर, प्रभू गवस, प्रज्ञा आंबेरकर व इतर मान्यवर तसेच शिवसेना युवासेनाचे आजी माजी पदाधिकारी व स्थानिक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची महत्त्वाची मुख्य जबाबदारी श्री संदेश उपरकर यांनी पार पाडत रमेश हरयान, प्रशांत सडविलकर, संभाजी माने, महेश कदम, दिलीप पेडणेकर, संदीप प्रभू, जयेश मगर, प्रविण टेमकर, गणेश चिकणे व इतर कार्यकर्त्यांसमवेत हा कार्यक्रम यशस्वी केला.