Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसातारा जि. प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने साताऱ्यात आज प्रशिक्षण...

सातारा जि. प. महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने साताऱ्यात आज प्रशिक्षण व शिबिर….

सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग यांच्या वतीने गुरुवार दिनांक एक ऑगस्ट रोजी क्रांती सिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात मिशन धाराऊ व माता दुग्ध अमृतम प्रशिक्षण व शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत एक हजार दिवसाच्या कालावधीमध्ये माता व बालक यांच्या प्रगतीच्या आढावा बाबत माहिती देण्यात येणार आहे . क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय ,सातारा येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे व मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हा माता व बालकांच्या विकासासाठी प्रशिक्षण व शिबिर होत आहे. सकाळी सुरू होणाऱ्या या शिबिरामध्ये माता व नवजात बालक यांच्या एक हजार दिवसाच्या कालावधीमधील २७० दिवसाची गर्भावस्था व ७३० दिवसाचे जन्मापासून दुसऱ्या वाढदिवसापर्यंत होणाऱ्या प्रगती व प्रक्रियेबाबत माहिती देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण व शिबिराची जोरदार तयारी सुरू झालेली आहे.
एक हजार दिवसाच्या कालावधीमध्ये ७० ते ८५ टक्के बालकांच्या मेंदूंचा विकास होतो. तर ५० टक्के उंचीची वाढ होते. हा कालावधी म्हणजे खऱ्या अर्थाने बालकाच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक पायाभरणीचा काळ असतो. याबाबतही उपयुक्त माहिती देण्यात येईल. या शिबिरामध्ये माता दुग्ध पेढी, मदर सपोर्ट ग्रुप याचीही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्वच गर्भावस्थेतील माता व महिलांसाठी हे शिबिर व प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त असून या ठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी व मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या शिबिरासाठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व वैद्यकीय अधिकारी, सामाजिक संस्था तसेच महिला बचत गट यांच्या माध्यमातूनही या शिबिरामध्ये सहभाग आहे. या उपयुक्त शिबिराला जास्तीत जास्त माता-भगिनी तसेच महिलांनी उपस्थित राहावे. यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सध्या माता व बालकांसाठी महिला व बालकल्याण विभाग तसेच इतर स्वयंसेवी संस्था मोठ्या प्रमाणात कार्यरत राहून बालकांची काळजी घेत आहेत .
सध्या अनेक साथीचे रोग व विकारामुळे घाबरून जाण्यापेक्षा योग्य मार्गदर्शन व औषधोपचार करून चिंतामुक्त व्हावे. यासाठी असे प्रशिक्षण व शिबिर उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेने दिले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments