प्रतिनिधी : जी उत्तर विभागातील सहाय्यक अभियंता श्री इरफान काझी हे १ आगष्ट २०२४ पासून महानगर पालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्ती होत आहेत याचे औचित्य साधून श्री काझी यांच्या संकल्पनेतून जी/उत्तर विभागामध्ये १५ जुलै २०२४ ते ३१ जुलै २०२४ पर्यंत स्वच्छता सप्ताह मोहीम राबविण्यात आली.या मोहीमेमध्ये आपापल्या प्रभागामध्ये स्वच्छता राबवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेला तसेच क.पर्यवेक्षकाला ११११/- रु श्री काझी यांनी सेवावृत्तीचे दिवशी देण्याचे जाहीर केले त्यानुसार या स्वच्छता सप्ताह मोहीमे मध्ये एकून ४४३३००/- एवढी रक्कम क.पर्यवेक्षक,तसेच क्लिनप मार्शल यांनी दंडात्मक कारवाई पोटी जमा केली.
या मोहिमेमध्ये ९ एस एम पी, या संस्था जाहीर केल्याप्रमाणे यशस्वी ठरल्या,तर चंद्रकांत तांबे हे क.पर्यवेक्षक बक्षीसास पात्र ठरले,तसेच ब्राईट गार्ड फोर्स ही क्लिनप मार्शल संस्थेने मोठी रक्कम जमा केल्यामुळे त्यांना सुध्दा बक्षीस देण्यात आले आहे.

श्री इरफान काझी सर यांचा सेवेतील आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांच्या सेवा पूर्ती सन्मान सोहळ्या निमित्त त्यांनी पात्र संस्थाना व क.पर्यवेक्षक यांना बक्षीस देऊन समाधान व्यक्त केले.