प्रतिनिधी : बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर 8 एप्रिल 2024 रोजी अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, फहद फासिल आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट 2021 च्या ब्लॉकबस्टर ‘पुष्पा: द राइज’ चा सिक्वेल आहे. ‘पुष्पा: द राइज’ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली असून प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीझर रिलीज झाल्याच्या बातमीने चित्रपटाचे चाहते खूप उत्सुक आहेत.
‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाचा धमाकेदार टीझर 8 एप्रिल ला ; अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत
RELATED ARTICLES