Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशिवसेनेचे चिन्ह,नाव सर्वकाही मिळेल,मात्र तोपर्यंत जोमाने कामाला लागा आणि आघाडी साठी घराघरात...

शिवसेनेचे चिन्ह,नाव सर्वकाही मिळेल,मात्र तोपर्यंत जोमाने कामाला लागा आणि आघाडी साठी घराघरात पोहचा – उद्धव ठाकरे

प्रतिनिधी : ग्रामीण भागात चोर कंपन्यांनी बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेनेचा धनुष्यबाण दावा सांगितला. चिन्हाचा निकाल लागणार आहे. शिवसेना हे नाव मलाच मिळणार आहे. परंतु त्यासाठी पाच पंचवीस वर्षे लागतील. आपणास मशाल चिन्ह मिळाले. त्याच्याशी साधर्म्य असलेली चिन्ह ठेवली जात आहेत. मशालीशी साधर्म्य असणारी चिन्हे ठेवू नका, अशी विनंती मी केली आहे. त्याचाही निकालास पाच पंचवीस वर्षे लागतील. परंतु आता आपल्यासोबत मुस्लिम अन् ख्रिश्चन आले आहेत, असे उबाठा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
जायचे असेल तर जा, दगाबाजी करू नका, शिवसैनिकांना घेवून मी ही लढाई जिंकेन. काही माजी नगरसेवक जातायत. त्यांनी आताच जावे, असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की, हे व्यापारी आपल्यात फूट पाडतायत. एवढे खाताय ते जातंय कुठे? खायला काही मर्यादा आहे की नाही? धनाढ्य व चोऱ्या माऱ्या करणारे दुबार मतनोंदणी करतायत. उपरी मुंबई वसवायला यांना मतदान करायचे का ? यावेळी झोपून राहिलो तर मुंबई उपऱ्याच्या हातात जाईल.
मराठीला प्रवेश नाही म्हणतात. पहिले कानफाट फोडा. गेटआऊट सांगून गुजरातला जायला सांगा. बुटचाटे लाचार खुर्चीसाठी आईवर वार करतायत. धारावीकरांना मुलूंड, दहिसर, मिठागरात टाकायचे डाव आहे. परंतु आपले सरकार आल्यावर धारावीचे टेंडरच रद्द कराणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांची कंत्राटदार माझा लाडका योजना सुरू आहे. त्यामुळे मुंबईत पावसात सगळीकडे पाणी तुंबतंय. बीएमसीची ९० हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता किती राहिलेत ते सांगत नाहीत. एमएमआरडीएला बीएमसीतून पैसा का ? बीएमसीला भिखेला लावत आहेत.

एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू
आमची सत्ता आल्यावर एमएमआरडीएला मुंबईतून हद्दपार करू. महापालिका या ठिकाणी आहे. या लोकांना गाडू ही शपथ घेवून निघा. प्रवाह उलटा फिरवणारा नेता असतो. ती ताकद आपल्यात आहे. घराघरात जावून मतदार यादी तपासा. गटप्रमुखांवर मोठी जबाबदारी. प्रत्येक यादीत आघाडी मिळवून द्या.असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रंगशारदा, बांद्रा येथील पदाधिकारी यांच्या मेळाव्यात आपली भूमिका मांडली.

RELATED ARTICLES

एक प्रतिक्रिया

  1. आदरणीय पत्रकार श्री.धुळप साहेब आपल्या धगधगती मुंबई पेपर न्युज चॅनलवर वरून जनहितार्थ व सामान्य जनतेला निगडित असलेल्या बातम्या प्रसारित होत आआसतात .. आमच्या कोयना सोळाशी कांदांटी विभागातील अनेक प्रश्न आपल्या पेपर न्युज मधुन शासन दरबारी पोहच होत आहे..
    याचा मला सार्थ अभिमान आहे
    सर आपल्या पत्रकारीला मनःपूर्वक सलाम
    आपला श्री.विठ्ठल तोरणे निपाणी तालुका जावली जय जय रामकृष्ण हरी

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments