Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रआण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून १ लाख लाभार्थ्यांना मदत मिळाल्याबद्दल सरकारचे आभार...

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून १ लाख लाभार्थ्यांना मदत मिळाल्याबद्दल सरकारचे आभार – नरेंद्र पाटील


मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आज 1,00,000 मराठा उद्योजकांची संख्या पुर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री व गृह मंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री ना. अजितदादा पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा संह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी यथोचित सत्कार केला.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे आजमितीपर्यंत 1,0014 लाभार्थी झाले असून, 8320 कोटी रुपये बँकांनी कर्ज वाटप केले आहे आणि महामंडळाने 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.
मराठा समाजाची आर्थिक उन्नत्ती व्हावी यासाठी राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले, या मंडळामार्फत विविध योजना जाहिर केल्या, या महामंडळाच्या अध्यक्ष पदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नेमणुक केली.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रियकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेतल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला.
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदय यांचेबरोबरच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रियकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी प्राणाचे बलिदान दिले, त्यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या अध्यक्ष पदी केलेले कार्य अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनिय असेच आहे, हे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन सिध्द होत असून, याबाबत मंत्री महोदय यांनी देखिल त्यांच्या कार्याचे कौतुक केले

फोटो – आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाकडून १ लाख लाभार्थ्यांना मदत मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानताना महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळ दिसत आहेत

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments