Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रप्रदीर्घ सेवेनंतर सातारा जि. प अतिरिक्त सी.ओ. श्री घुले साहेबांच्या सेवानिवृत्ती…

प्रदीर्घ सेवेनंतर सातारा जि. प अतिरिक्त सी.ओ. श्री घुले साहेबांच्या सेवानिवृत्ती…

सातारा(अजित जगताप) : कृषी अधिकारी ते सातारा जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत मजल मारणारे श्री महादेव घुलेसाहेब यांनी आज ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती स्वीकारली आहे. त्यांच्या कार्य काळामध्ये सातारा जिल्हा परिषदेने केलेले नावलौकिक अनेकांच्या कायम स्मरणात राहणार आहे. श्री महादेव घुले हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस गावचे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण माळशिरस व माध्यमिक शिक्षण अकलूजला झाले. त्यानंतर पुणे येथील कृषी महाविद्यालयामध्ये त्यांनी बीएससी ही पदवी प्राप्त केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी त्यांनी एम एस सी शिक्षण घेतले. त्यांची कृषी अधिकारी पदी निवड झाली असताना त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत दाखल झाले. दि २ जानेवारी १९९२ पासून ते ३१ जुलै २०२४ अशा प्रदीर्घ ३३ वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी अधिकारी म्हणून जिल्हा परिषद बीड, गटविकास अधिकारी म्हणून अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये चांगले काम केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तेरा वर्षी ते पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रशासकीय बाब व लोकांची अडीअडचण सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. दि१३ सप्टेंबर २०२१ पासून सातारा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहून ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या कार्य काळामध्ये पर्यावरण समतोल समृद्धी ग्राम योजना, वृक्ष लागवड व विक्रमी ग्रामपंचायत कर वसुली करण्यात आली .संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये २००४ साली त्यांनी दौंडचे गट विकास अधिकारी म्हणून राज्यात पहिला क्रमांक मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता.१९९५-९६ च्या कारकिर्दीमध्ये क्रांतिवीर अहिल्याताई होळकर यांचे जन्मगाव चौंडी (जामखेड) या ठिकाणी स्मारक होण्यासाठी त्यांनी मोलाचा सहभाग घेतला होता. सेवानिवृत्तीनंतर समाजकार्य व शेती यामध्ये त्यांनी कार्यरत राहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची गुणवत्ता व दर्जा टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी सर्व सहकाऱ्यांशी चांगल्या पद्धतीने विचार विनिमय ठेवला होता. अनेक वाड्या वस्तीमध्ये विकास कामे पोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार त्यांनी तातडीने मंजुर कामे केली आहे .याची गावकुसाबाहेरील अनेक वाड्या वस्तीतील लोक आठवण काढत आहेत. त्याच्या सेवानिवृत्ती निमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो व समाजकार्यातून त्यांच्याकडून समाजाची सेवा घडो. अशी सदिच्छा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश अनिल उबाळे व ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, विशाल कदम यांच्यासह मान्यवरांनी व्यक्त केली आहे. आज त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त छोटासा निरोप समारंभ आयोजित केला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments