कराड(प्रताप भणगे) : शिक्षणाचे माहेर घर मानल्या जाणाऱ्या कराड तालुक्यातील औधगिक प्रशिक्षण संस्था,कराड मधील या शासकीय कॉलेजची अवस्था काय? प्रत्येक वर्गात पाणीच पाणी साचलं आहे.त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम हे सरकार करत आहे,याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होत आहे,महाराष्ट्र सरकार विविध योजनांची घोषणा करत आहे,मात्र या पूर्वी सुरू केलेल्या योजना असो की संस्था याकडे दुर्लक्ष होत आहे,त्यामुळे नवीन योजना करत असताना जुन्या योजना,त्या संस्था पूर्ववत करायला हव्यात त्या सरकारने अगोदर कराव्यात. सातारा जिल्हा प्रशासनाने या बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गातून होत आहे.
कराड येथील औधगिक प्रशिक्षण संस्थेचा इमारतीत पाणीच पाणी; विद्यार्थ्यांचे हाल
RELATED ARTICLES