प्रतिनिधी : कराड येथील संतकृपा शिक्षण संस्थेच्या, संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मध्ये सोमवार २९ जुलै रोजी वृक्ष संवर्धन दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या व संस्थेच्या परिसरातील झाडांची व त्या झाडांच्या परिसरातील स्वच्छ्ता केली,
या प्रसंगी मा. मोहनराव नायकवडी युवा उद्योजक मुंबई यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त २५ विविध प्रकारची झाडे शाळेला भेट दिली. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. उषा जोहरी आणि संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी शुभेच्छा दिल्या.
कराड येथील संतकृपा इंटरनॅशनल स्कूल मध्ये वृक्ष संवर्धन दिन उत्साहात साजरा
RELATED ARTICLES