दादर (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिके मधील घकव्य खात्यामध्ये कार्यरत असणाऱ्या चतुर्थी श्रेणी वर्गातील ई.१० वी,१२वी, पदवीका तसेच पदवी प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच त्यांचे अभिनंदन करणे आणि पुढील शैक्षणिक करिअर शुभेच्छा देण्यासाठी हा समारंभ मनपा अधिकारी संदेश मटकर,श्रीम स्वाती केदारे आणि WE 2FOR ही सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता.
याप्रसंगी सुपरवाईझर श्री रत्नकांत सावंत यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना सांगितले की शैक्षणिक करिअर करताना विद्यार्थ्यांनी सामाजिक क्रांती करणारे समाजसुधारक यांची पुस्तके वाचली पाहीजेत त्या बरोबर भारतीय संविधान हे सुध्दा अभ्यासले पाहिजे,तसेच विद्यार्थ्यांनी सतर्क राहून अद्यायवत रहाणे ही काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.हेमंत घाटगे, समुप होते.
तसेच जी/उत्तर विभागातील कामगार, कर्मचारी , अधिकारी, आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिर्के तर आभार प्रदर्शन प्रविण मोहीते यांनी केले.
