धारावी(महेश कवडे) : मुंबई शहर व पूर्व तसेच पश्चिम उपनगरांना जोडणारा दुवा असलेला मध्य रेल्वेवरील शीव रेल्वे स्थानकासमोरील रस्ता क्रमांक 3-ए सायन नावाने परिचित असलेला वाहतुकीच्या पुलावरून जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे सायन च्या दिशेकडून धारावीतून जाणाऱ्या ‘बेस्ट’ ची बस सेवा खंडित झाली आहे. यासंदर्भात धारावी नागरिक समितीने बससेवा पूर्ववत व सुरळीत व्हावी यासाठी धारावी ‘बेस्ट’ बस आगाराला निवेदन देऊन मागणी केली आहे.
शीव कडून कुर्ला व वांद्रे च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक पुलावर सतत वाहतूक सुरु असते. सार्वजनिक व खासगी वाहनांची इथून दिवसरात्र सुरु असते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून यात खंड पडलेला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे वाहतूक पूल कमकुवत झाल्याने फक्त हलक्या वाहनांसाठी चालू ठेवण्यात आला आहे. काही काळानंतर वाहतूक पूल पाडण्याचे नियोजन होत आहे. पूल पाडल्यावर तर वाहतुकीची अजून गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे.
सध्या धारावीतून बस सेवा मोठ्याप्रमाणावर रहित केल्याने धारावीतील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यासाठी समितीने पुढाकार घेऊन धारावीकरांना होत असलेल्या त्रासातून मुक्तता मिळावी यासाठी धारावी बस आगारात अधिकाऱ्यांसोबत निवेदन देऊन चर्चा केली. अधिकाऱ्यांनी चर्चेस सकारात्मक प्रतिसाद देत अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. समितीने पालिका प्रशासन, ‘बेस्ट’ प्रशासन, वाहतूक विभाग व धारावी पोलीस ठाणे यांची संयुक्त बैठक घेऊन 90 फुटी रस्त्यावरील अडथळे दूर करून तिथून बस सेवा फिरवावी असे सुचवले आहे. तशी संयुक्त बैठक लवकरच घेण्याचे आश्वासन धारावी बस आगाराचे अधिकारी सुशील कुलकर्णी यांनी दिले आहे. समितीतर्फे यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. या चर्चेच्या वेळी श्री कुलकर्णी यांनी समितीचे म्हणणे ऐकून घेऊन सध्या सुरू असलेल्या बस व्यवस्था मार्ग नियोजन काही अडचणी बाबत सकारात्मक चर्चा केली सदर निवेदन काळजीला डेपो व्यवस्थापक श्री सुभाष भट्टाचार्य यांच्याकडे देऊन चर्चा करू व तुम्ही सादर केलेल्या समस्यांवर रस्त्यावरील बदललेले बस थांबे रूट नंबर त्यांचे बोर्ड लावणे संदर्भात प्रयत्न करू वाहतूक पोलीस सिटी पोलीस पालिका प्रशासन बेस्ट प्रशासन व स्थानिक संस्था संघटना त्यांची एकत्र बोलविण्याची मागणीवर समिती प्रतिनिधी भूमिका मांडली अपेक्षा आहे की बेस्ट प्रशासन या तक्रार व जा निवेदनावर मध्यम मार्ग निघेल लेखी उत्तराच्या लोकसभागाच्या अपेक्षांनी प्रश्न मार्गी लागतील चर्चेअंती ठरले. नागरिक समितीचे प्रमुख संघटक दिलीप गाडेकर समाजसेवक गिरीराज शेरखाने पत्रकार संजय शिंदे यांनी धारावी बस डेपो अधिकारी श्री सुशील कुलकर्णी यांना देखील निवेदन देऊन वरील मागणी केली आहे.
धारावीतील बदललेली वाहतूक व्यवस्था आणि नियोजनाबद्दल धारावी नागरिक समितीचे निवेदन
RELATED ARTICLES
Bridge tar Sion banvat ahe kalakila t junction etya ka badh theval ahe apala kiti tras hoto bus nahi tar