Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रशुभांगी गोखले ताई…जशी नजर, तसा विचार…!!! प्रशांत बढे - पत्रकार

शुभांगी गोखले ताई…जशी नजर, तसा विचार…!!! प्रशांत बढे – पत्रकार

शुभांगी गोखले ताई….जशी नजर तसा विचार
गणपती बाप्पाचा सदबुद्धी देवो आपणास..!!!
शुटींग च्या झगमगाट मधून बाहेर या आणि झोपडपट्ट्या आणि मुंबईच्या रस्त्यांवर जरा गणपती नंतर आणि आधी फिरा…
काय आहे गाडीच्या काचा खाली न करणारे तुम्ही सो कॉल्ड फेमस कलाकार तुम्हाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्ते काय कळणार….?
२६ जुलै सारखा पाऊस असो, माळीण सारखी दुर्घटना असो कोकणातील पूर असो किंवा कोव्हिड सारखी महामारी ..अश्या मोठ्या घटना असो किंवा मग विभागातील गरजूंना छोट्यातली छोटी मदत…हे चौकात उभे राहून गणेशोत्सवाच्या गप्पा मारणारे कार्यकर्तेच सर्वात आधी मदतीला उभे असतात. सार्वजनिक गणेशोत्सव बंद झाले तर सामाजिक भान असणारे कार्यकर्ते तर सोडा, पण देश चालवणारे नेते ही तयार होणे बंद होईल…आमच्या सारखे अनेक जन गणेशोत्सव मंडळाने घडविलेत…बातम्यांसाठी माईक हातात घेण्याआधी आयुष्यात पहिल्यांदा माईक हाती हा गणपती बाप्पाची मंडपात आरती म्हणताना घेतला होता…
समाज काय असतो? संघटीत कामगिरी काय असते? सामाजिक कार्य म्हणजे नेमके काय? हे सर्वात आधी गणेशोत्सव मंडळ शिकवतात.
तुमच्या म्हणण्यातील एक गोष्ट योग्य आहे…दारू आणि जुगार…पण गेली दोन वर्ष आम्ही मंडळांना आव्हान केल्यावर अनेकांनी यात सुधारणा ही केल्यात…पण अशी बोटावर मोजण्याइतकी मंडळे असतील त्याचा दोष हजारो मंडळांना लागत नाही.
राहीला प्रश्न झगमगाट, आवाज आणि याव त्याव…तर तो आपल्या शुटिंग वरील सेट पेक्षा नक्कीच कमी असतो की…
असे खूप काही आहे मंडळात, भावनिक नाते, सामाजिक भान, जनजागृती, संघटन कौशल्य, सामाजिक एकता, आध्यात्म आणि खूप काही….
बघा सुधारा…आणि बप्पा आहेच नाहीतर अक्कल द्यायला….
बाकी पोरानो झाली का तयारी, मूर्ती केली का बुक..डेकोरेशन काय यंदा?…
असल्यांवर दुर्लक्ष करा…आपल्या बाप्पाचा उत्सव आहे…झोकातच साजरा करा…!!!
गणपती बाप्पा मोरया..!!
—आपला प्रशांत बढे(पत्रकार)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments