मुंबई (संतोष गावडे ) : अंधेरी पुर्वे विभागातील मरोळ विभागात रविवारी (दि. २८ जुलै )शिवसेना शाखा ८६ (उबाठा ) व भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते श्री. राजुदादा सुर्यवंशी यांच्यावतीने शिवसेना कार्याध्यक्ष श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवसनिमित्त भव्य आरोग्य शिबीर पार पडले.या शिबिरात मधुमेह,रक्तदाब तपासणी,ईसीजी तपासणी,नेत्र तपासणी, सर्दी, ताप,आदी बहुतेक सर्वच आजारांच्या अनुषंगाने तज्ञ डॉक्टरांकरवी नागरिकांची तपासणी करून आवश्यक औषधे पूर्णतः मोफत देण्यात आली.तसेच काही गंभीर आजार लक्षात घेऊन त्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी वयोवृद्ध व आजारी नागरिक, ज्यांना सहज चालणे शक्य होत नाही, अशा नागरिकांना आधार काठीचे व वॉकरचेही वाटप करण्यात आले. स्थानिक आमदार ऋतुजा लटके वहिनी यांच्या शुभ हस्ते शुभ आरंभ करण्यात आलेल्या या शिबिरात अंधेरी पूर्व विधानसभा संघटक श्री.प्रमोद सावंत,उपविभाग प्रमुख अरविंद शिंदे, शाखाप्रमुख बिपिन शिंदे, महिला शाखा संघटक सरिता रेवाळे, महिला शाखा संघटक पार्वती निकम, सारिका जाधव, युवा सेनेचे किरण पुजारी, देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार, निरपा तिरुवा, आदी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.साधारण २०० नागरिकांची यावेळी संपूर्णतः मोफत तपासणी करण्यात आली. उपशाखाप्रमुखपदी विराजमान असलेले भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिबिराचे आयोजक, सर्वेसर्वा श्री.राजुदादा सुर्यवंशी व श्री.शुभम सुर्यवंशी या पितापुत्रांनी शिबिराच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांचे व शिबिरात सहभागी नागरिकांचे आभार मानले.
अंधेरी येथे शिवसेना शाखा ८६ (उबाठा ) व भैरवनाथ जनसेवा संस्थेतर्फे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर संपन्न
RELATED ARTICLES