सातारा (अजित जगताप) : मानवी कल्याणाचा संदेश सर्वच जाती धर्माच्या गुरुंनी दिला आहे त्यांचा आदर्श घेऊन सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी साताऱ्यात महामानव घटनाकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना आज विनम्र अभिवादन करून कार्यभार स्वीकारला आहे.
राजकारणात व धर्मकारण ही रथाची दोन चाकी आहेत .त्यामुळे धर्म व राजकारण हे वाटचाल करण्यासाठी उपयुक्त आहे. परंतु, त्याचा अतिरेक जर झाला तर काय घडू शकते? याचे ज्वलंत उदाहरण आपल्याकडे सर्वत्र पाहण्यास मिळत आहे . त्यामुळे दोन्हींना सीमारेषा ठेवून काम करण्यासाठीच श्री रमेश उबाळे यांनी सुरुवात केलेली आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर युवा नेते जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी महाराष्ट्रात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे झंजावात उभे करण्याचा संकल्प केला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, अजित जगताप,साहित्यिक अरुण जावळे, ऋषिकेश किनीकर , ओ.बी.सी. सेलचे संजय शिंदे, तालुकाध्यक्ष संजय कांबळे, तालुका उपाध्यक्ष रामा निकम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष संतोष राठोड, मजदूर सेनेचे अध्यक्ष शेखर बनसोडे, मजदूर सेनेच्या शहराध्यक्ष लहू मोरे, अल्पसंख्यांक महिला जिल्हाध्यक्ष महिला आसमा शिकलगार ,मराठा सेल संघ जिल्हाध्यक्ष निलेश घाडगे, जिल्हा सल्लागार गुरव , संजय नित्यनवरे,