Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रशिवसेना(उबाठा)प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या...

शिवसेना(उबाठा)प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथे साहित्य वाटप


मुंबई (शांताराम गुडेकर ) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेच्या माध्यमातून २७ जुलै उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वसई येथील लोकनायक जयप्रकाश जयप्रकाश नारायण कृष्ठरोग निर्मूलन हॉस्पिटल येथे आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले.यावेळी प्रमु पाहुणे विनायक निकम विधानसभा संघटक,किरणकर माजी नगरसेविका गटनेत्या,भगवान वजे वसई तालुका प्रमुख,विजय शर्मा,सुरेश मिश्रा वाहतूक सेना यांच्या उपस्थितीत पाण्याची फिल्टर मशीन,कपडे धुण्याची वॉशिंग मशीन,सिलिंग फॅन तीन,डायनिंग टेबल, रबर मॅट ५० नग, कपडे धुण्याचे साबण, अंघोळीचे डेटॉल साबण, तेलाची बाटली , फिनेल,बिस्किट इत्यादी वस्तू आरोग्यदायी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर,संदीप चादीवडे(सचिव), दौलत बेल्हेकर( संचालक), दिपक चौधरी(कार्यकारणी सदस्य),वसंत घडशी(कार्यालप्रमुख),बढु चौधरी,संजय चव्हाण,विनय चौधरी,मेघा सावंत,वनिता वायकर,निर्मला आवटे,स्वरा पवार, इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments