मुंबई(महेश कवडे) : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवा कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्या प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी आयुक्त व प्रशासक श्री.भूषण गगराणी यांना दिले होते.मात्र यावर गगराणी यांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. याच्या निषेधार्थ उद्या सोमवार (दि.२९) सर्व आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका दिवसभर काम बंद ठेवून शासन व प्रशासनाला जागे करण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत,
मागण्यांवर मनपा आयुक्त व प्रशासक यांच्या बरोबर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०१५ पासून किमान वेतन, २०११ पासून भविष्य निर्वाह निधी व पेन्शन, उपादान, प्रसूती रजा, तांत्रिक सेवा खंड बंद करणे, आशा ना वाढीव वेतन देणे, आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांवर त्यांना सामावून घेणे, गट विमा योजना लागू करणे,
इत्यादी मागण्यांवर सोमवारी चर्चा होईल.
वरील सर्व मागण्या कायद्याच्या तरतुदीनुसार आहेत त्यामुळे या मागण्या आयुक्त आणि प्रशासक नाकारू शकणार नाही.
आशा ना १७०० सी एच वी ची पदे रिक्त आहेत त्यावर आशा सेविकांना सामावून घेतल्यास त्यांचे वेतन आरोग्य सेविकाप्रमाने होईल.
असे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. श्री.प्रकाश देवदास म्हणाले.
