मुंबई : गोवंडी परिसरातील महापालिकेच्या शताब्दी रूग्णालयात गेल्या महिन्यापासून एमआरआय मशीन बंद असल्याने गोरगरीब रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मशीन बंद असल्याने एमआरआय तपासणीसाठी रूग्णांवर खासगी रूग्णालयात जाण्याची वेळ आली आहे.त्यामुळे अशा रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शताब्दी रुग्णालय हे पूर्व उपनगरातील रुग्णांच्या सतत वर्दळीचे केंद्र बनले आहे.याठिकाणी चेंबूर, गोवंडी,मानखुर्द, शिवाजीनगर,ट्रॉम्बे,माहुल गाव आणि वाशी नाका येथील सर्वसामान्य रुग्णांवर उपचार केले जातात.त्यामुळे शताब्दी रुग्णालयातील हे एमआरआय मशीन पालिकेने तत्काळ दुरुस्त सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा,अन्यथा आंदोलन छेडावे लागेल असा इशारा माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान,दररोज किमान ५०० रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचे सांगितले जाते.मात्र या रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याठिकाणी येणार्या अशा तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात पाठवले जात आहे.
गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयातीलएमआरआय मशीन महिनाभरापासून बंद! ‘बेस्ट’चे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांचा आंदोलनाचा इशारा
RELATED ARTICLES