प्रतिनिधी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंजाब आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडच्या राज्यपालपदाचा बनवारीलाल पुरोहित यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यासोबतच त्यांनी इतर राज्यांतील राज्यपालांच्या नव्या नियुक्त्यांची घोषणा केली. तेलंगणाचा अतिरिक्त कार्यभार असलेले झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्णन हे रमेश बैस यांची जागा घेतील. तर, भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.