प्रतिनिधी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खास पहिल्यांदाच कोयनारत्न भजनसम्राट संकल्पना निर्माते गीत संगीत गायक राजाराम बुवा शेलार यांच्या संगीत रचनेतून साकारलेला कणखर, संयमी, लढवय्या नेतृत्वाचा जबरदस्त “उद्धवसाहेब बंदुकीची गोळी” या पोवाड्याचे अनावरण मातोश्री येथे निलेश रोहिदास भोर ( हिंगोली लोकसभा समन्वयक, शिवसेना विभाग प्रमुख कल्याण शहर ), रविन्द्र कपोते (विधानसभा संघटक, कल्याण), ॲड. साईश तानाजी जाधव, माऊली खंडांगळे व श्रेयश दळवी (छत्रपती स्टुडिओ) यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते पार पडले. संपूर्ण पोवाडा राजाराम बुवा शेलार यांच्या यूट्यूब चॅनेलवर आहे. त्यांची लिंक आपण नक्की पहावी.
https://youtu.be/uMdJOWHn-Xc भजनसम्राट,कोयनारत्न राजाराम बुवा शेलार यांनी या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,सुप्रिया सुळे,अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यावर गाणी,पोवाडे बनवली असली तरी त्यांची गणपती,छत्रपती शिवाजी महाराज तसेच अनेक लोकप्रिय गाणी त्यांनी स्वरबद्ध केलेली आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अलीकडच्या काळात झालेल्या अन्यायावर प्रकाश टाकणारा हा पोवाडा महाराष्ट्रात नक्कीच धुमाकूळ घालणार,महाराष्ट्रातील शिवसैनिक तो डोक्यावर घेणार असा विश्वास राजाराम बुवा शेलार यांनी व्यक्त केला.त्यांची लिंक आम्ही आपल्याला देत आहोत नक्की पहा शेअर करा,लाईक करा ही विनंती.
