Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रसुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा ; डोंगर पायथ्याच्या रांजणी गावातील नागरिक भीतीच्या...

सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा ; डोंगर पायथ्याच्या रांजणी गावातील नागरिक भीतीच्या छायेखाली

भिलार  : डोंगरमाथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील घोटेघर आणि सुलेवाडी येथील डोंगराला मोठमोठ्या भेगा पडून भुस्कलनामुळे हा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे माळीणसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणी व सुलेवाडीचे ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन मुसळधार पावसात जीवन कंठीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून डोंगरमाथ्यावरील घोटेघर येथील सुमारे २०० ते २५० लोकवस्तीच्या सुलेवाडी वस्तीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सुमारे २० ते २५ एकर क्षेत्राच्या शेतजमीन व डोंगर उताराला मोठमोठाल्या दीड कीमी लांब व एक ते दीड फूट रुंद अशा भेगा पडल्या आहेत पाऊस बेफाम कोसळत असल्याने या भेंगांमध्ये पाणी जाऊन त्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे भूस्खलन होऊन हा अख्खा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर जाणार आहे त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभित झाले आहेत. तर सुलेवाडीकर लोकवस्ती भेदरून गेली आहे. हा डोंगर घसरल्यास सुलेवाडीच्या आत्माराम लक्ष्मण पडसरे, सीताराम लक्ष्मण पडसरे, बाळू रामचंद्र पडसरे, तुकाराम लक्ष्मण पडसरे , दत्तू लक्ष्मण पडसरे, हरिभाऊ लक्ष्मण पडसरे, प्रकाश हरिभाऊ पडसरे, हरिभाऊ पडसरे, वसंत महादेव सावंत, सहदेव नाना पडसरे, बाळू भागूजी पडसरे, सुरेश दगडू पडसरे, बाळू दगडू पडसरे, महादेव रघु झाडे, संतोष महादेव झाडे , बाबुराव रामचंद्र पडसरे यांच्या घराना या भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे.

२०१९ साली याच ठिकाणी डोंगराला अशाच पद्धतीने भेगा पडल्या होत्या या वेळी शासनाने सुलेवाडी गावातील काही लोकांना तात्पुरते स्थलांतरित केले होते. तर रांजणी येथील ६० लोकांसाठी निवारा शेड उभारले होती. परंतु ती अध्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली नसल्याने अजूनही अपूर्ण असल्याने ती अपतग्रस्ताना दिली नाहीत.

या जमीन घसरण्याच्या प्रकाराने आणि जसजसा पाऊस वाढतोय तसतशा भेगा वाढून डोंगर राजणीच्या दिशेने सरकू लागल्याने आपलीही घरे घसरतील की काय यामुळे सुलेवाडीकर भीतीच्या छायेखाली वास्तव्य करीत आहेत.
पावसाचा जोर वाढत असल्याने ग्रामस्थ भयभीत जीवन जगत आहेत.
आज सकाळी या भूस्खलन झालेल्या जागेची पाहणी सरपंच मंदा रांजणे, माजी सरपंच सुनील सपकाळ, सदस्य रामचंद्र रांजणे, ग्रामस्थ शामराव रांजणे, गजानन सपकाळ, संपत रांजणे, दिगंबर रांजणे, पोलीस पाटील किरण जंगम, ग्रामसेवक आयेशा मोमीन, कर्मचारी दीपक पवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट : पावसाचा जोर तीव्र झाल्यास हा डोंगर केव्हा कोसळेल यांची शक्यता नसल्याने पाऊस वाढला पायथ्याच्या रांजणी गावच्या ग्रामस्थांच्या काळजात धस्स होत आहे.

प्रतिक्रिया : रामचंद्र रांजणे, ग्रामस्थ
डोंगरमाथ्यावरील शेतीचे या भेगांमुळे नुकसान झाले असून जमिनींचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. जर हा डोंगर खाली जाऊ लागला तर आमची राहती घरेही या भूस्खलनात वाहून जातील की काय अशी परिस्थिती असल्याने शासनाने याचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. वारंवार घडणाऱ्या या घटनामुळे शासनाने व भुअभ्यासकानी जमिनीची पाहणी करून ठोस उपाययोजना करावी. आंम्ही सर्व ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहोत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments