Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रमुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत आशिष शेलार पॅनेलचा दारुण पराभव; अंजिक्य नाईक पॅनल...

मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत आशिष शेलार पॅनेलचा दारुण पराभव; अंजिक्य नाईक पॅनल विजयी

प्रतिनिधी : संपूर्ण भारतीय क्रिकेटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ‘बीसीसीआय’ आणि ‘एमसीएचे’ माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्याने अजिंक्य नाईक यांनी तब्बल १०७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. अजिंक्य यांनी भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या गटाच्या संजय नाईक यांचा पराभव केला.

गेल्या महिन्यात अमेरिकेत टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना झाल्यानंतर ‘एमसीए’चे अध्यक्ष अमोल काळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यानंतर या रिक्त झालेल्या पदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. यावेळी, एकूण ३७३ पात्र मतदारांपैकी ३३५ मतदारांनी मतदान केले. 

यामध्ये अजिंक्य यांनी २२१ मते मिळवली, तर संजय यांना केवळ ११४ मते पडली. यासह ३७ वर्षीय अजिंक्य यांनी ‘एमसीए’चा सर्वांत युवा अध्यक्ष बनण्याचा मान मिळवला. अजिंक्य यांनी विजय मिळवल्यानंतर सांगितले की, ‘मी आधीच सांगितल्याप्रमाणे ही दु:खाच्या  वातावरणातील निवडणूक आहे. त्यामुळे हा विजय अमोल काळे यांचा आहे. त्यांचा वारसा जपण्यासाठी मी लढलो. ज्येष्ठ नेते शरद पवारांसह इतर पक्षांतील नेत्यांचेही आभार मानतो. मुंबई क्रिकेटच्या प्रगतीसाठी सर्व प्रयत्न करीन. रणजी चषक आणि भारतीय संघासाठी खेळाडू निर्माण करण्याचा आमचा प्रमुख उद्देश आहे.या मान्यवरांची उपस्थिती ठरली विशेष झहिर खान, अजित आगरकर, सुरु नायक, मिलिंद रेगे, डायना एडुल्जी, रमेश पोवार, करसन घावरी, जतिन परांजपे, सलील अंकोला, ॲबी कुरुव्हिल्ला, सुलक्षणा नाईक, संजय मांजरेकर, बलविंदर संधू, पारस म्हांब्रे या माजी क्रिकेटपटूंसह माजी हॉकीपटू धनराज पिल्ले यांनी उपस्थिती दर्शवली. त्याचप्रमाणे, राजकीय क्षेत्रातून मंत्री मंगल प्रभात लोढा, आ. आशिष शेलार, आ. आदित्य ठाकरे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. क्षितिज ठाकूर, आ. मिलिंद नार्वेकर, आ. प्रसाद लाड, आ. प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित हाेते. हे मतदानाला अनुपस्थितसुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, चंद्रकांत पंडित, प्रवीण आमरे यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मतदानाला अनुपस्थित हाेते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments