Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनि:शुल्क २५ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन-

नि:शुल्क २५ वी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन-

प्रतिनिधी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, भोसरी, ही काव्य संस्था  तर्फे दरवर्षी कवींच्या काव्य लेखनीला धार मिळण्यासाठी राज्यस्तरीय श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले जाते. कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच श्रावण व निसर्गया विषयावरील कवींनी दोन कविता पाठवाव्या. नि:शुल्क ही काव्य स्पर्धा २५ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना रोख रक्कम ,स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र ,गुलाब पुष्प,शाल देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. दरवर्षी या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. सलग या स्पर्धेचे २५ वर्ष आहे. प्रत्यक्ष सहभागींना फोरकलर सन्मानपत्र,
गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात येणार आहे.

कवींनी आपल्या कविता दिनांक २५ ऑगस्ट २०२४ आखेपर्यंत खालील पत्त्यावर पोस्टाने पाठवाव्या.
कवींनी आपला पूर्ण पत्ता मोबाईल पिन कोड कविता पाठवाव्या.
कविता पाठवण्याचा पत्ता-
प्रा. राजेंद्र सोनवणे
अध्यक्ष -नक्षत्राचं देणं काव्यमंच
साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाइट्स, पीसीएमटी चौक, भोसरीपुणे -४११०३९.*

आतापर्यंत काव्यमंच तर्फे सात अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन, ११० प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्य मैफल, शेकडो कार्यशाळा काव्य बैठका, काव्य सहलीचे आयोजन केले आहे. काय मनसेच्या संपूर्ण महाराष्ट्रात शाखा कार्यरत आहे. संस्थेला पंचवीस वर्षे पूर्ण होत आहे. असे अध्यक्ष राजेंद्र दशरथ सोनवणे यांनी एका पत्रकाद्वारे कळवले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments