कोल्हापूर : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. आ. अबू असिम आझमी हे आज शुक्रवार दि. २६ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून ते गजापूर, विशाळगड येथील दंगल ग्रस्त पीडित कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. आज दुपारी एक वाजता ते कोल्हापूर एअरपोर्ट येथून पांढरेपाणी, गजापूर, विशाळगड या सर्व ठिकाणी जातील. त्या ठिकाणी संबंधित पीडितांची भेट घेतील व समक्ष माहिती घेतील. स्थानिक परिस्थिती व वस्तुस्थितीची पाहणी करून ते परत कोल्हापूर येथे येतील. कोल्हापूरमध्ये शेतकरी कामगार पक्ष कार्यालयात सायंकाळी त्यांची पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर ते परत मुंबईस रवाना होतील.” अशी माहिती प्रताप होगाडे कार्याध्यक्ष समाजवादी पार्टी महाराष्ट्र यांनी जाहीर प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेली आहे
समाजवादी पार्टीच्या या शिष्टमंडळामध्ये प्रदेश अध्यक्ष मा. आ. अबू असिम आझमी यांच्याबरोबर या दौऱ्यामध्ये कार्याध्यक्ष प्रताप होगाडे, प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी, महासचिव शिवाजीराव परुळेकर, महासचिव अनिस अहमद, महासचिव डॉ. राऊफ शेख, कोल्हापूर शहर अध्यक्ष मधुकर पाटील, सांगली जिल्हा अध्यक्ष नितीन मिरजकर, भारत पाटील, नुरुल हक, खुशनूर लाला, जहीर खान, हारून रशीद, अली इनामदार, इत्यादी पदाधिकारी या दौऱ्यामध्ये सहभागी होणार आहेत. अशीही माहिती प्रताप होगाडे यांनी दिली आहे.