Monday, June 16, 2025
घरमहाराष्ट्रविधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित...

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा २८ जुलै रोजी शपथविधी ; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ

मुंबई :  नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या सदस्यांचा २८ जुलै रोजी शपथविधी आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित सदस्यांना देणार शपथ.

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले. यावेळी निवडून आलेल्या सर्व सदस्यांना यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून शपथ दिली जाणार आहे.

यामध्ये श्री.योगेश टिळेकर, श्रीमती.पंकजा मुंडे ,श्री.परिणय फुके, श्री.अमित गोरखे ,श्री.सदाभाऊ खोत , श्रीमती.भावना गवळी, श्री.कृपाल तुमाने, श्री.शिवाजीराव गर्जे,श्री.राजेश विटेकर,श्री.मिलिंद नार्वेकर, श्रीमती.प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

विधानभवनातील सेंट्रल हॉल मध्ये रविवार दि. २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments