नवीमुंबई (प्रतिनिधी) : पत्रकार व समाजसेवक भिमराव धुळप यांच्या मातोश्री बाळकाबाई हिंदुराव धुळप यांच्या रक्षाविसर्जन नंतर काळाजी गरज म्हणून ‘झाडे लावा,झाडे जगवा’ या उद्देशाने कोपरखैरणे, नवी मुंबई येथील मुक्तीधाम स्मशानभूमी मध्ये आंबा,पेरू,पिंपळ,अशा विविध प्रकारच्या झाडाचे वृक्षारोपण केले. वृक्षप्रेमी संजय भावके यांच्या सहकार्याने हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आला,यावेळी दैनिक महासागरचे उपसंपादक गजानन तुपे,वृक्षप्रेमी संजय भावके,एकनाथ तांबवेकर, राघव साळुंखे,धगधगती मुंबईचे संपादक भिमराव धुळप,गणेश धुळप आदी उपस्थित होते.

भाऊपूर्ण श्रद्धांजली!!🙏🏽😔