प्रतिनिधी (अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा शहरात अनेक अति महत्त्वाच्या व्यक्ती येऊन गेल्या. पण, त्यांना फारसा त्रास जाणवला नाही. पेन्शनरचे शहर अशी ओळख असल्याने बहुदा पोलिसांचाही या शहरावर विश्वास होता. अलीकडच्या काळात परिस्थिती बदलली असून अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्या वेळी पोलिसांना खबरदारीचे उपाययोजना करून सुद्धा कार्यक्रम स्थळी सामान्य नागरिकांना प्रवेश देताना अडचण येत होत्या. काल एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या सातारा दौरा होता.नेहमीच पोलीस विभागाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या काही पत्रकारांना प्रवेश नाकारला. त्यामुळे प्रसार माध्यमाचे गळचेपी करणाऱ्या बंदोबस्तातील काही अनोळखी पोलीस अधिकाऱ्यांना टीका सहन करावी लागली. साताऱ्यात वाघनखे आली. पण, पोलिसांचा कार्यपद्धतीचा कोथळा बाहेर निघाला. अशी आता प्रसार माध्यमातून चर्चा रंगू लागलेली आहे.
याबाबत माहितीकारांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त सातारा येथे महाराष्ट्र शासन पुरातत्व वस्तुसंग्रहालयाचे संचालनालय सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित शिव शस्त्र शौर्यगाथा शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाघाटन व विक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालय, लंडन इथून आणलेल्या वाघनखे शस्त्र त्याचप्रमाणे साडेतीनशे व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकिटाचे अनावरण असा भरगच्च कार्यक्रम होता. सदर कार्यक्रमाची नियोजित वेळ ही शुक्रवार दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होते. परंतु, मान्यवर मंडळी वेळेवर येऊ न शकल्यामुळे सदरचा कार्यक्रम दोन तास उशिरा सुरू झाला. या कालावधीमध्ये पुणे- मुंबई व दिल्ली येथून आलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधी सोबतच सातारच्याही काही प्रतिनिधींना पास विना प्रवेश नाकारला. त्यांना प्रवेशद्वाराजवळच ताटकळत उभे राहावे लागले.
प्रसार माध्यमांबाबत ही अवस्था तर त्याहीपेक्षा बिकट अवस्था सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांची झाली होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यांसमोर गप्पा मारणाऱ्या काही नेत्यांना प्रवेश नाकारल्यामुळे त्यांची राजकीय कोंडी झाली होती. अखेर जेव्हा मान्यवरांची मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात आल्यानंतरच काही कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. तोपर्यंत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना पाणी सुद्धा कोणी विचारले नाही. प्रसार माध्यम प्रतिनिधी व शासकीय अधिकारी तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांना अक्षरशा दरबार हॉलच्या पायरीवर बसून वाट पहावी लागली. सदरच्या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त असणे. हे गरजेचे आहे. प्रोटोकॉल प्रमाणे प्रत्येकांचे संरक्षण करणे. सातारा पोलिसांचे ते कर्तव्य आहे. कारण, काही वेळेला अति महत्त्वाच्या व्यक्तीला त्रास झाला तर त्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेवर येते. त्यामुळे या बंदोबस्ताबाबत कुणाचीही तक्रार नाही. पण, काही अनोळखी पोलीस यंत्रणेमुळे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला एका पोलीस बांधवांचा मार खावा लागला. अखेर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी त्या प्रतिनिधीची भेट घेऊन त्याची समजूत काढली. खरं म्हणजे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीला सातारा पोलीस यंत्रणेच्या पत्रकार परिषदेला व्हाट्सअप ग्रुप वरून निमंत्रण दिल्यानंतर ते बिचारे धावत जाऊन वृत्त संकलन करतात. त्याला प्रसिद्धी देतात. पण अशा काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना चक्क पासेस देण्यास सुद्धा नकार देण्यात आला. इथपर्यंत ठीक होते. चारित्र्य पडताळणीची अटक करण्यात आली. याचे सर्वांना नवल वाटले. काही लोकप्रतिनिधीवर आजही विविध न्यायालयात खटले सुरू आहेत. काही पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी नक्कीच प्रयत्न केले. पण, प्रसारमाध्यमातील काहींच्या चारित्र्य तपासणी करणे. याला मराठी भाषेत काय म्हणी आहे. ते आता बातमी लिहिताना आठवत नाही. ती नम्रपणे आठवून वाचकांनी बातमी वाचन करावी ही विनंती आहे.
एकूणच साताऱ्यातील या वाघ नखे कार्यक्रमात झालेल्या प्रकाराबाबत साताऱ्यातील पत्रकारांबाबत नेहमीच जागरूकपणे काम करणारे पत्रकार संघाचे अध्यक्ष व राज्य अधिस्वीकृत समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष हरीश पाटणे , ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, सुजित आंबेकर व मान्यवरांनी सर्व पत्रकारांची बाजू भक्कमपणे मांडली. स्थानिक वृत्तपत्रांनी निर्भीडपणाने वृत्त देऊन याची दखल घेतलेली आहे. साताऱ्यातील प्रसारमाध्यमांकडेही कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे. ती जबाबदारी ते समर्थपणाने मांडण्यास काही ठराविक प्रसारमाध्यम सक्षम आहेत. याची जाणीव ठेवावी. असे ज्येष्ठ पत्रकारांनी स्पष्ट केले आहे.
साताऱ्यात आली वाघनखे पण, बंदोबस्ताच्या अतिरेकाने निघाला कोथळा…
RELATED ARTICLES