घाटकोपर – बातमीदार : राज्य क्रीडा दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर क्रीडा प्रतिष्ठान (जीकेपी) बास्केटबॉल कोर्ट, आचार्य अत्रे मैदान पंतनगर घाटकोपर पूर्व येथे झालेल्या 17 वर्षांखालील मुले/मुली सांघिक बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे पंतनगर घाटकोपर आणि एमपीएस, विलेपार्ले संघांनी जेतेपद पटकावले. 10 ते 11 जानेवारी 2024 या कालावधीत झालेल्या स्पर्धेत सर्व सामने चुरशीचे झाले. मुले गटात गोरेगाव एमपीएस संघ आणि मुली गटात वरळी सीफीएस संघांना उपविजेतेपद मिळाले. राज्य क्रीडा दिनाच्या निमित्ताने मनपा शाळेतील क्रीडा विभागातील विशेष कार्य करणारे क्रीडाशिक्षक आणि प्रशिक्षक यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेला राजेश घाडगे (क्रीडा अधिकारी मनपा), लक्ष्मण गोसावी (पालिका अधिकारी), अनिल सनेर (पालिका अधिकारी), सविता नायडू (मुख्याध्यापिका), नीता जाधव ( क्रीडाशिक्षिका), दत्तू लवटे (शारीरिक शिक्षण विभाग), मायकल अँड्र्यु (राष्ट्रीय खेळाडू), एम. व्यंकटेश (बीएफआय),; गोविंद मुत्तू कुमार (सचिव एमएसबीए), सुजीत झेंडे (सचिव), अजय बागल (अध्यक्ष) आणि सचिन मठपती (मुख्य प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले.
पंतनगर घाटकोपर, एमपीएस, विलेपार्ले संघांना जेतेपद १७ वर्षांखालील मुले/मुली सांघिक बास्केटबॉल स्पर्धा
RELATED ARTICLES