Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रगुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन‌तर्फे उर्मिला माने विद्यालय आसगे,आदर्श विद्या मंदिर देवधे हायस्कूल लांजा...

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन‌तर्फे उर्मिला माने विद्यालय आसगे,आदर्श विद्या मंदिर देवधे हायस्कूल लांजा येथे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील गवाणे गावचे सुपुत्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे उपाध्यक्ष,ऑल इंडिया हायकोर्ट फेडरेशनचे सदस्य,गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष-समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि मुंबई मुलुंड येथे राहणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्ना गावडे मॅडम (बी.ए.एम.एस/ एम.डी(आयुर्वेदचार्य) तसेच छत्तीसगड उच्च न्यायालय बेलासपूर कोर्टाच्या सहाय्यक अधिकारी श्रीमती यामिनी पाटणवार मॅडम(Yamini Patanwar,Designation - Asst. Gr.-I Court- High Court of Chhattisgarh, Bilaspur )यांच्यावतीने लांजा येथील उर्मिला माने विद्यालय आसगे येथे वह्या वाटप करण्यात आले.यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष- समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे,उपाध्यक्ष- सुभाष धनाजी रामाणे,सचिव अमोल मिस्त्री, सदस्य- रवींद्र कोटकर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्री.अनिल कसबले,सचिव-श्री.मनोज चंदुरकर,आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक आसगे संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, कार्यवाहक राजाराम चव्हाण, संचालक काशीराम मांडवकर,स्थानिक हितचिंतक कमिटीचे सदस्य विकास मांडवकर,विश्वास मांडवकर,दिलीप दाभोळकर,विनायक शेलार,अनिल कांबळे,कृष्णा भारती,विष्णू मांडवकर,प्रशाळेतील मुख्याध्यापिका साधना बावधनकर, व उपस्थित सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते. तर गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष-समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे माजी अधिकारी श्री.विनोद फरकाडे(मुख्य अनुवाद आणि दुभाषी), नाशिक मालेगावचे ग्रामस्थ श्री.सुरेश पवार यांच्यावतीने लांजां येथील आदर्श विद्या मंदिर देवधे हायस्कूल येथे वह्या वाटप करण्यात आले.यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष- समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे,सचिव अमोल मिस्त्री, सदस्य- रवींद्र कोटकर,मुख्याध्यापक - श्री.सुशांत पर्शराम राईन,सहाय्यक शिक्षिका - सौ. विजया राजेंद्र पाटील,सहाय्यक शिक्षिका - श्रीमती अनुजा बाबू कांबळे,सहाय्यक शिक्षिका सौ.अवनी नथुराम सावंत,सहाय्यक शिक्षक संपत भिवा करवंदे,दिलीप धोंडू लाड,विजय सोना हरमळे,सेक्रेटरी हरिश्चंद्र शि.मणचेकर,अध्यक्ष एकनाथ रघुनाथ सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.ग्रामीण भागात मुलांसाठी घेतलेल्या या दोन्ही उपक्रमाचे अनेकांनी कौतुक करत गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन‌चे चंद्रकांत करंबळे आणि सर्व पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक आणि या उपक्रमला मदत करणारे मान्यवर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments