Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रनेरुळ पोलिसांची दिव्यांग बांधवाला मदत;हरवलेल्या वस्तू दिल्या मिळवून

नेरुळ पोलिसांची दिव्यांग बांधवाला मदत;हरवलेल्या वस्तू दिल्या मिळवून

प्रतिनिधी : नेरुळ येथील रहिवाशी  असलेले दिव्यांग संजीवकुमार यादव हे काही कामानिमित्त ऑटोरिक्षा मधून जात असताना त्यांचा त्या रिक्षामध्ये लेपटॉप आणि पर्स व त्या पर्स मधील क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड हे सर्व विसरून ते विसरून गेले होते. संबंधित रिक्षावाला यालाही त्याची माहिती नव्हती. मात्र तोपर्यंत संजीवकुमार यांच्या लक्षात आले कि,आपल्या वस्तू गाडीत विसरलो असल्याचे त्यांनी त्वरित नेरुळ पोलीस ठाणे येथे रीतसर तक्रार दाखल केली. परंतु ज्या रिक्षामध्ये ते या वस्तू विसरले.त्या रिक्षावाला यांनी सुद्धा त्या पोलीस ठाणे येथे जमा केल्या नव्हत्या. नेरुळ पोलिसांनी सर्व रिक्षाधारकांना याबाबत विचारणा केल्यानंतर सुद्धा हाती काहीच लागले नाही, संबंधित विभागातील सी सी टीव्ही च्या साहाय्याने त्या रिक्षाचा नंबर मिळाला व त्या वस्तू संबंधित रिक्षावाला यांच्याकडून हस्तगत केल्या.(त्यांनीही भीतीपोटी पोलीस ठाणे येते देण्यास टाळाटाळ करत होता) मात्र नेरुळ पोलीस ठाण्याचे 

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी,ए पी आय निलेश शेवाळे,उपनिरीक्षक नरले,हवालदार पाटील , संतोष राठोड गणेश आव्हाड,मोहन सरगर,भोये यांच्या प्रयत्नाने त्या वस्तू दिव्यांग संजीवकुमार यादव यांना परत केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून संबंधित पोलीस ठाण्यातील सर्वजन खुश झाले.त्याला अशाप्रकारे मदत केल्याचा आनंद पोलिसांच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसत होता.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments