सातारा(अजित जगताप) : साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडावर शौर्य दाखवून स्वराज्याच्या स्थापनेसाठी शिवपराक्रम केला. याचे साक्षीदार असणारी वाघनखे इंग्लंडहुन साताऱ्यात आली . अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तू संग्रहालयाच्या इमारतीमध्ये ही वाघनखे कडक पोलीस बंदोबस्त ठेवले आहेत. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सी.सी.टी.व्ही. पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ अधिकारी यांच्यासह राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक उपस्थित झालेले आहेत. या वस्तू संग्रहालयामध्ये असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बॉम्ब शोध पथकाचे डष्टी श्वानने मानवंदना दिली. सदर डष्टी श्वानाचे हॅण्डलिंग करणारे पोलिस दलातील संदेश बलकवडे रायगड जिल्ह्यातील असून योगायोगाने म्हणजे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व वरिष्ठ अधिकारी सोमनाथ घार्गे हे सध्या रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत आहे. डष्टी श्वानाने मध्य प्रदेशातील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या निगराणीखाली सहा महिने खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. याचबरोबर साताऱ्यात मानवंदना देण्यासाठी मोठा उत्साह दाखवला होता. अनेक नामांकित पत्रकारांच्या मागणीनुसार श्वानाने मानवंदना दिली. सकाळी सात वाजल्यापासून ते दुपारी दिड वाजेपर्यंत बॉम्ब शोध पथकाच्या जबाबदारीने थकता संपूर्ण परिसराची पाहणी केली. या डष्टी श्वान सोबतच मॅक्स व बोना हे लॅब्रेटर जातीचे तीन भाऊ सुरक्षेची काळजी घेत आहेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात सर्व जागेची कडक तपासणी करून या श्वानाने अनेकांची मन जिंकली.श्वान प्रामाणिक व सर्वांचे काळजी घेणारा असल्याने सर्व समाजाचा त्याच्यावरती विश्वास आहे त्याच्या कार्यामुळे खऱ्या अर्थाने मानव जात सुरक्षित राहिलेली आहे. असे मत सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे, समीर वहागावकर व मान्यवर सातारकरांनी व्यक्त केले आहे.