Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरविशाळगड हिंसाचारानंतर सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी

विशाळगड हिंसाचारानंतर सरकारचे प्रतिनिधी उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी

प्रतिनिधी : कोल्हापुरातील विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागले. गेल्या काही वर्षांपासून किल्ले विशाळगडावरील अतिक्रमणे हटवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही शिवप्रेमींना विशाळगड येथे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर जमावाने केलेल्या दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहनांचे नुकसान झालं. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी रोष व्यक्त करत सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. आता पहिल्यांदाच सरकारमधून उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावर दाखल झाले.जाहिरातअजित पवार यांनी केली नुकसानीची पाहणी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज विशाळगडाला भेट दिली. यावेळी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. इथल्या नागरिकांनी सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केली आहे. यावर आता सरकार काय भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे आहे.शाहू महाराज छत्रपती यांनीही केली पाहणी विशाळगड हिंसाचारानंतर या भागाची खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासह इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गजापुरात पाहणी केली होती. यावेळी त्यांना मदतीचा हात देखील देण्यात आला होता. यावेळी अनेकांचे संसार रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. महिलांना आक्रोश पाहून महाराज देखील गलबलून गेले होते. आक्रमक भूमिका घेतलेल्या छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेवर त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली.
१४ जुलै रोजी माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांनी विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी हाक दिली होती. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र, संभाजीराजे हे समर्थकांसह गडावर पोहोचण्यापूर्वीच रवींद्र पडवळांच्या चिथावणीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात गजापुरात हिंसा केली होती. रवींद्र पडवळसह कोल्हापुरातील बंडा साळोखे यांच्यावर ही जमावाला भडकवण्याचा आरोप आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments