सातारा (अजित जगताप) : सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. आतापर्यंत ३६ हजार रुग्णांवर उपचार करून सुमारे तीनशे कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश मंदाकिनी नरसिंह चिवटे यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत दिली. ना वशिला ना ओळख थेट मिळते मदत… अशा पद्धतीने रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी थेट स्वतः अर्ज करावा. कोणत्याही मध्यस्तांच्यामार्फत अर्ज करू नये. तसेच यासाठी कुठल्याही खाजगी व्यक्ती किंवा संस्था सोबत आर्थिक देवाण-घेवाण करू नये. असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा अर्ज मिळवण्यासाठी कोड स्कॅन करा. हॉस्पिटलची यादी सुद्धा उपलब्ध आहे. १७ मार्च २०१५ रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाला परंतु कोविडच्या काळामध्ये तसेच पूर्वीच्या सरकारने याकडे फारसं लक्ष न देता फक्त अडीच कोटी रुपये खर्च केले. या उलट आताच्या सरकारने अडीच वर्षाच्या काळात सुमारे तीनशे कोटी रुपये ३६ हजार रुग्णांसाठी वैद्यकीय मदत मिळवून दिलेली आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. पारदर्शक कारभार होत आहे . लहान मुलावरही तातडीने उपचार होत असून काही मुलांच्यावर शस्त्रक्रिया केल्यामुळे लहान मुले बोलू लागलेले आहेत. एक जुलै २०२२ पासून श्री चिवटे हे कामकाज पाहत आहेत. पुढील महिन्यात एक ऑगस्ट रोजी यासाठी एक नवीन ॲप येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी सुलभता येणार आहे. विविध प्रकारच्या २० आजारासाठी ही योजना असून गंभीर आजारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून नागरिकांना मदत केली जाते. विहित नमुन्यात अर्ज, वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, लहान बाळांसाठी आईचे आधार कार्ड, रुग्णांचे शिधापत्रिका, आजाराबाबतचे चाचणी तपासणी अहवाल ,अपघातग्रस्तांसाठी एफ. आय. आर. रिपोर्ट तसेच शरीराच्या अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी शासकीय समितीची मान्यता या सर्व गोष्टीची पेपर स्कॅन करून पीडीएफ फाईल मेल आयडी वर पाठवावी. अशी ही योजना असून अर्ज पाठवण्याकरता टोल फ्री क्रमांक व्हाट्सअप हेल्पलाइन ८६५०५६७५६७ असा क्रमांक आहे. अर्ज पाठवण्याकरता aao.cmrf-mh@gov.in असा ईमेल आयडी आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवण्यासाठी दररोज किमान २०० अर्ज प्राप्त होतात. या अर्जाची छाननी करून मंजुरी दिली जाते. त्यामुळे एकही अर्ज प्रलंबित नाही. असे श्री मंगेश मंदाकिनी नरसिंह चिमटे यांनी पत्रकारांना माहिती दिली. या योजनेमुळे गरीब, कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी, सामान्य नागरिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने लाभ मिळाले आहे. सदरच्या योजनेसाठी संयोजक म्हणून रामहरी जिजाबाई भीमराव राऊत हे सुद्धा सहकार्य करत आहेत. मूळ संकल्पना ही श्री चिवटे यांची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील व्यक्तींना याचा लाभ होईल. अशी सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे. राज्याचे मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार तसेच मान्यवर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, रुग्णालय व सेवाभावी संस्था यांचे मोलाचे योगदान लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची वाटचाल तीनशे कोटीवर वैधकीय कक्ष अधिकारी चिवटे यांची माहिती
RELATED ARTICLES