प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडले. यावेळी राज्य सरकारकडून अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. यानंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. पण महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार नाही, अशा निर्णय थेट दिल्लीतून घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांचे स्वप्न भंगलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने रंगताना दिसत होत्या. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी अनेक नेते इच्छुक असल्याची माहितीही समोर आली होती. मात्र या इच्छुक मंत्र्यांच्या इच्छेवर विरजण पडलं आहे. दिल्ली भाजपातील वरिष्ठ नेत्यांकडून एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार नाही. महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता कमी आहे. पण येत्या काही दिवसात खाते बदल होण्याची शक्यता मात्र वर्तवली जात आहे, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारसोबत अजित पवारांनी हातमिळवणी करत सरकारमध्ये एंट्री केली. त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार पार पडला होता. या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांच्या गटातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात मंत्रीपदं मिळाली होती. यानंतर एक वर्ष उलटून गेल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. त्यातच महायुती सरकारमधील शिंदे गट आणि अजितदादा गट हे सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. तसेच यावेळी चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचेही बोलल जात होतं. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.
मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट, अजित पवार गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. तसेच गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्ताही यावेळी केल्या जातील असं बोललं जात होतं. मात्र भाजप हायकमांडने महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेक नेत्यांच्या स्वप्न भंग झाले आहे.
महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावर टांगती तलवार? अनेक नेत्यांचे स्वप्न भंगले
RELATED ARTICLES