Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात; सातारा येथील पुरातन वस्तुसंग्रहालयात ठेवणार

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे महाराष्ट्रात; सातारा येथील पुरातन वस्तुसंग्रहालयात ठेवणार

प्रतिनिधी(मंगेश कवडे) : लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमसोबत झालेल्या करारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे बुधवारी महाराष्ट्रात दाखल झाली. सातारा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुरातन वस्तुसंग्रहालयात ही नखे ठेवण्यात येणार असून, येत्या १९ जुलैला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या

उपस्थितीत भव्यदिव्य विशेष सोहळा पार पडणार आहे.

मोघल सरदार अफझल खानाचा छ. शिवरायांनी वाघनखांनी कोथळा बाहेर काढला होता. आता महाराष्ट्रात आणलेली वाघनखे लंडन येथीलव्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ठेवण्यात आली होती. राज्यात ही वाघनखे आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणण्याचा करार झाला आहे. या करारानुसार, वाघनखे लंडनहून विशेष विमानाने मुंबईत दाखल झाली. राज्यातील जनतेलाही वाघनखे पाहता यावीत, याकरिता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम, कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये या वस्तुसंग्रहालयात टप्याटप्याने ठेवली जाणार आहेत. राज्य सरकार ३ वर्षांसाठी लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला सुमारे १४ लाख ८ हजार रुपये मोजणार आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मताधिक्य घटल्याने महायुतीच्या जागा कमी झाल्या. आता आगामी निवडणुकीसाठी महायुती सरकारने भाडेतत्त्वावर वाघनखे आणण्याचा घाट घातला आहे; परंतु छत्रपती शिवरायांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला तीच ही वाघनखे आहेत का, याबाबत शंका उपस्थित केल्या जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments