प्रतिनिधी (नितीन गायकवाड) : महाबळेश्वर
– शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आणि समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक शिक्षकांसाठी आपली वाटणारी संघटना म्हणजे प्राथमिक शिक्षक संघ..
महाबळेश्वर तालुक्यात नव्याने रुजू झालेले शिक्षण विस्तार अधिकारी श्री अभिजित भालेराव व श्री नामदेव धनावडे साहेब यांच्या स्वागताचा कार्यक्रम शिक्षक संघाच्या वतीने
कार्यक्रम आयोजित करून पुष्पगुच्छ, शाल, आणि पुस्तक भेट देऊन स्वागत सत्कार करण्यात आला.
स्वागत आणि शुभेच्छा देताना अध्यक्ष सुरेंद्र भिलारे यांनी महाबळेश्वर तालुका शैक्षणिक उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी पळसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेले काम उल्लेखनीय आहे. याची माहिती दिली.
नवनियुक्त शिक्षण विस्तार अधिकारी श्री नामदेव धनावडे साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना जावली आणि महाबळेश्वर तालुका एकच आहे. माझ्या सेवेची सुरुवात पूर्वी जावली तालुक्यात आणि आता महाबळेश्वर तालुक्यातील शाळेत झाली होती याची माहिती देऊन महाबळेश्वर या दुर्गम तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आदरणीय पळसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करू असे अभिवचन दिले.
श्री अभिजित भालेराव साहेब यांनी तापोळा बीट विस्तार अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. 10 वर्ष तालुका बाहेर करताना आपल्या स्व तालुक्यात परत येण्याची ओढ कायम होती पण अधिकारी म्हणून येणे हे माझ्यासाठी पुण्याचे काम आहे असे म्हणाले. शिक्षकांना दोष देण्यापेक्षा दोष दूर करून शिक्षण प्रवाह अधिक प्रवाही करेन असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाबळेश्वर तालूका शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावर ठेवणारे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री आनंद पळसे साहेब यांनी स्वागत करताना शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना प्रशासन अधिकारी यांचे महत्त्व सांगितले. ही गुणवत्ता टिकवण्यासाठी अधिकारी, शिक्षक यांनी प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चित ध्येय गाठता येईल. यासाठी प्रशासन आणि शिक्षक संघटना यांनी समनव्याने काम करणे आवश्यक आहे. हे काम महाबळेश्वर तालुक्यात उत्तम होते असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन करणारे प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ यांनी महाबळेश्वर तालुका जिल्हा व राज्याला उपक्रम देत आहे यामध्ये शिक्षण महोत्सव, प्रज्ञा शोध परीक्षा, आणि वाचन कट्टा हे उपक्रमाची उदाहणे दिली.
या कार्यक्रमासाठी महाबळेश्वर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री आनंद पळसे साहेब शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री सुरेंद्र भिलारे, नगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री संतोष शिंदे, सरचिटणीस श्री अंकुश केळगणे प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक श्री संजय संकपाळ, फलटण चे विस्तार अधिकारी श्री धारासिंग निकाळजे व श्री रवींद्र भरते साहेब, श्री अरुण कदम, श्री संजय पार्टे, श्री अमित कारंडे, श्री संतोष ढेबे, श्री संजय सोंडकर, श्री संतोष चोरगे, श्री लक्ष्मण जाधव, श्री रवी भिलारे, सेवानिवृत्त शिक्षक श्री अनंत जाधव, श्री संभाजी जाधव, श्री दानवले गुरुजी,श्री नारायण कासुर्डे, हे संघटनेचे पदाधिकारी व संघप्रेमी शिक्षक यांची उपस्थिती होती. या बरोबर श्री सुहास कुलकर्णी, BRC विषय शिक्षक, भिमनगर गावचे ग्रामस्थ समाज बांधव मित्र परिवार पत्रकार नितीन गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री संतोष शिंदे सर केले.
महाबळेश्वर तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नवनिर्वाचित विस्तार अधिकारी भालेराव,धनावडे सत्कार
RELATED ARTICLES