Sunday, December 15, 2024
घरदेश आणि विदेशदलितनेते आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचे सूत्रधार शोधण्यासाठी सीबीआयकडे चौकशी सोपवावी - केंद्रीय राज्यमंत्री...

दलितनेते आर्मस्ट्राँग यांच्या हत्येचे सूत्रधार शोधण्यासाठी सीबीआयकडे चौकशी सोपवावी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

चेन्नई  – तामिळनाडूतील दलित नेते आणि बीएसपी चे प्रदेश अध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येची सीबीआय द्वारे सखोल चौकशी करून हत्येतील प्रमुख सूत्रधार शोधून त्यांना कठोर शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केली.

आज ना.रामदास आठवलेंनी चेन्नई येथील दिवंगत आर्मस्ट्राँग यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.यावेळी रिपाइं चे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष फादर सुसाई उपस्थित होते.
तामिळनाडूत दलित समाज सुरक्षित नाही.दलित नेते कार्यकर्ते सुरक्षित नाहीत. दलितांवर अत्याचार वाढले आहेत.ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लक्ष द्यावे.दलितांवर वारंवार अत्याचार होत आहेत दलितांवर होणाऱ्या अत्याचाराचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत.दलितांवरील हल्ले तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी रोखावेत याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आपण पत्र लिहून तामिळनाडूत दलितांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने तातडीने उपाययोजना करावी अशी सूचना आपण करणारे असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.

दिवंगत आर्मस्ट्राँग हे आंबेडकरवादी नेते कार्यकर्ते होते.जय भीम चा नारा बुलंद करणारे नेते होते.बसपा चे प्रदेश अध्यक्ष म्हणून ते काम करीत होते .घराचे बांधकाम बघण्यासाठी आले असता दि 5 जुलै ला काही जणांनी सामूहिक हल्ला करून त्यांची हत्या केली यातील 8 मारेकरी पोलिसांनी अटक केले आहेत मात्र या हल्ल्यामगील कट रचणारे खरे सुत्रधार कोण आहेत शोधण्यासाठी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारे पात्र आपण
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या कडे करीत आहोत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments