Sunday, August 3, 2025
घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 288 जागेवर विधानसभेत काँग्रेस सह इंडिया आघाडीचा तिरंगा फडकावा ही पांडुरंगा...

महाराष्ट्रात 288 जागेवर विधानसभेत काँग्रेस सह इंडिया आघाडीचा तिरंगा फडकावा ही पांडुरंगा चरणी प्रार्थना – तानाजी घाग

प्रतिनिधी : आषाढी एकादशी निमित्त सालाबादप्रमाणे मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनात प्रतीक्षा नगर प्रभाग क्रमांक 173 मधील समस्त काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुंदर विहार विठ्ठल मंदिराशेजारी तुळशी वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पाडला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुंबई प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष  तुषार एकनाथ गायकवाड तसेच मुंबई प्रदेश काँग्रेस चे खजिनदार श्रीमान संदीप शुकला यांनी हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढविली.यावेळी प्रभाग क्रमांक 173 चे ब्लॉक अध्यक्ष नवीन गायकवाड सह प्रमुख पदाधिकारी वसंत कांबळे,प्रवीण रस्ते,रामआसरे यादव,सचिन,सह महिला ब्लॉक अध्यक्षा स्मिता पाटील सह तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबध्द पद्धतीने कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग क्रमांक 173 चे कार्याध्यक्ष आणि मुंबई प्रदेश कामगार एवं कर्मचारी संघटनेचे KKC सरचिटणीस श्री.तानाजी घाग यांनी अत्यंत रसाळ शब्दात यशस्वी केले,यावेळी तानाजी घाग यांनी मुंबई काँग्रेस सह विभागीय नागरिकांचे आभार मानत असताना लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई करानी दिलेली साथ याबद्दलही आभार मानताना या वर्षी 288 तुळशी वाटप करण्यामागे संपूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य निरोगी राहावे,आणि येत्या विधानसभेत 288 जागेवर काँग्रेस सह इंडिया आघाडीचा तिरंगा फडकावा अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments