
मुंबई(रमेश औताडे) : सर्वात जास्त खासदार निवडणुकीत जिंकून आलेले उत्तरप्रदेश हे राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात समाजवादी पार्टीच्या करिष्म्याने मोदी सरकारला धक्का दिला. उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पार्टीने जे काही केले ते महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राबविण्यासाठी व सर्व तयारीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी या सर्व 37 खासदारांची बैठक मुंबईत होत आहे.
याबाबतची माहिती समाजवादी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आबु आसिम आझमी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आझमी म्हणाले, महाराष्ट्रात आगामी निवडणुका लढविण्यासाठी सपा ने 27 जुलै रोजी रंगशारदा सभागृहात एका बैठकीचे आयोजन केले आहे. उत्तर प्रदेश मध्ये जो करिश्मा आमच्या पार्टीने दाखवला तोच आता महाराष्ट्रातही दाखवणार. उत्तर प्रदेश मधील जनता मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.असे आमदार रईस शेख म्हणाले. यावेळी पार्टीचे प्रमुख महासचिव मेराज सिद्धकी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वधर्म समभाव हे वाक्य मोदी सरकार विसरले असल्याने त्यांना 400 पार चा आकडा गाठता आला नाही. जात धर्म यापलीकडे जाऊन माणूस म्हणून काहीतरी भूमिका घ्या. नाहीतर भविष्यात भाजपला खुप अवघड जाईल. गड किल्ल्यांवर होणारे अतिक्रमण किंव्हा इतर कोणत्याही ठिकाणी होत असलेले अतिक्रमण हे चुकीचे आहे. यासाठी सरकारने कायद्याचे पालन करत अतिक्रमण कारवाई करावी. कुणालाही कायदा हातात घेण्याचे धाडस झाले नाही पाहिजे असा कायदा करा. सर्वांना तो कायदा लागू करा.अशी मागणी आझमी यांनी यावेळी केली.