सातारा(अजित जगताप) : पाऊल चालती करहर प्रति पंढरीची वाट…. अशी भक्तीची प्रथा करहर नगरीत गेले अनेक वर्ष सुरू आहे. आषाढी एकादशी निमित्त एक दिवस का होईना उपस्थित सर्व वारकऱ्यांच्या मुखी फक्त विठू माऊली व संतांचा गजर असे दृश्य पाहून ग्रामीण भागातून आलेल्या हरिभक्त पारायण यांना मनशांती मिळाली आहे.
करहरच्या भूमीत अध्यात्मिक समाधानाने आषाढी एकादशीला संतमात्म्यांनी केलेल्या कार्याचा गौरव वारकऱ्यांच्या मुखातून टाळ मृदंगाच्या नादात गुंतला.
विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला जावळी तालुक्यातील करहर परिसरातील पालखी सोहळा म्हणजे खऱ्या अर्थाने विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्याचे भाग्य लाभले . आज माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले जावळीचे तहसीलदार हनुमंतराव कोळेकर गटविकास अधिकारी मनोज भोसले , मेढा पोलीस अधिकारी पृथ्वीराज ताटे व उद्योजक वसंतराव मानकुंमरे, श्रीहरी गोळे, महादेव भालेघरे, वैशाली शिंदे, रवि परामणे, बाळासाहेब पवार, प्रकाश भोसले, राजाराम धनावडे,अर्जुनराव गावडे, सुधीर शिंदे, प्रदीप गोळे, प्रकाश शिंदे यांच्यासह खेड्यापाड्यातून पालखी घेऊन आलेल्या भक्तगणांनी श्री माऊलीचे दर्शन घेऊन सर्वांना सुख- शांती- समृद्धी मिळावी. अशी मनःपूर्वक प्रार्थना केली.
काटवली , पानस, दापवडी , विवर, कावडी,बेलोशी, वहागाव, महू – हातगेघर, खर्शी- बारामुरे, दांडेघर, आखाडे, हुमगाव, आंबेघर, सलपाने, रुई, कुडाळ, शेते, भालेघर, सोमर्डी, पाचगणी, रांनगेघर, इंदवली,आलेवाडी, भिवडी, सोनगाव,दरे,भिलार,महाबळेश्वर, मेढा, सायगाव, बामणोली अशा अनेक गाव वाड्या वस्तीतील वारकऱ्यांनी सहभाग घेतला होता. माता भगिनींसोबत युवा पिढीचे आध्यात्मिक गोष्टीकडे कल वाढत आहे . खऱ्या अर्थाने करहर नगरी आषाढी एकादशी निमित्त एक दिवसासाठी अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
करहर परिसरातील भाविक व वारकरी ह. भ. प. दत्तात्रय महाराज कळंबे यांच्या प्रेरणेतून करहर नगरीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज अशा संत महात्म्यांच्या नावाच्या दिंडी घेऊन प्रति पंढरपूर नगरीत येऊन माऊलीच्या प्रतिभेचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली आहे.
विठ्ठल नामाचा गजर सर्वत्र घुमत असल्याने खऱ्या अर्थाने प्रति पंढरपूर सजून गेलेले आहे. वास्तविक पाहता वर्षभर अनेक घडामोडी घडतात? या काळात राजकीय वादन व चिपळ्यांच्या आवाजही वारकऱ्यांच्या आवाजात मिसळून जातो. त्याचेही दर्शन या निमित्त करहर परिसरात दिसून आलेले आहे.
प्रति पंढरपूर म्हणजे करहर हे जावळी तालुक्यातील तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जाचे प्राप्त झालेले आहे .आषाढी एकादशीला ज्यांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. अशा प्रामाणिक व स्वच्छ मनाच्या वारकऱ्यांसाठी करहर या गावात बहिर्जी पांगारे नावाच्या एका विठ्ठल भक्त त्याच्या भक्तीमुळे हे प्रति पंढरपूर उभे राहिलेले आहे. निरंजन नदीच्या डोळ्यात स्नानासाठी गेले असता त्यांना विठ्ठल रुक्माई ची मूर्ती सापडली. या मूर्तीची प्रतिष्ठापना करहर गावातील दानशूर व आध्यात्मिक वारसा लाभलेल्या एका पिढीने केली.
प्रति पंढरपूर करहर मध्ये वारकऱ्यांच्या मुखी फक्त संतांचा गजर
RELATED ARTICLES