Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रसाताऱ्यात रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांबाबत संस्थेचे मौन तर नागरिकांचे उपोषण…

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेतील निकृष्ट कामांबाबत संस्थेचे मौन तर नागरिकांचे उपोषण…


सातारा(अजित जगताप) : बहुजन समाजाला शिक्षणाची द्वार खुली करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याच रयत शिक्षण संस्थेमार्फत रयत सायन्स अँड इंनोव्हेंशन ऍक्टिव्हिटी सेंटर रामनगर वऱ्ये या ठिकाणी आहे. सदरच्या कामाच्या निकृष्ट दर्जाच्या बाबत निवेदन दिले पण त्याची दखल घेतली नाही. अखेर जागरूक नागरिक मंदार गानु व सौ पल्लवी गानु यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. सदरच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेच्या रामनगर – वऱ्ये येथील कामांचा ठेका नीरज प्रो प्राइवेट लिमिटेड पुणे या कंपनीला दिलेला आहे. त्याबाबत लेखी तक्रार रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
सदर संस्था योग्य ती कारवाई करीत आहे. असे पत्र दिनांक एक जुलै २०२४ रोजी पत्र पाठवून उपोषणाचे आंदोलनाचा मार्ग अवलंबू नये .अशी विनंती केल्यामुळे उपोषण आंदोलन झाले नाही परंतु ,त्याबाबत प्रत्यक्षात जागेवर पाहणी केली असता रयत शिक्षण संस्थेने कोणतीही कार्यवाही केली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून याबाबत सातारा जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी व गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी अमर उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला वाढता पाठिंबा मिळत आहे.
सदर संस्थेमध्ये ग्रामीण भागातील बहुजन समाजाची अनेक मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. एखादी घटना घडून गेल्यानंतर सर्वच यंत्रणा खडबडून जागी होते. परंतु, आता जे घडलेले आहे त्याबाबत जागृतपणाने माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही. याला लोकशाही म्हणायचे आहे का? असा प्रति प्रश्न उपोषणकर्ते श्री मंदार गांनु यांनी केलेला आहे. सदर उपोषणाला सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके, अजित जगताप व मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे. रयत शिक्षण संस्थेसारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत एखाद्या ठेकेदाराची चूक दाखवून सुद्धा दुर्लक्ष होत असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचार खरोखरच रयत शिक्षण संस्थेमध्ये अमलात आणले जातात की नाही? असा प्रश्न आता बहुजन वर्गाला पडलेला आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments