Monday, December 16, 2024
घरमहाराष्ट्रजयेश ट्रेनिंगच्या तायक्वांदो अकादमीतील खेळाडू साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज

जयेश ट्रेनिंगच्या तायक्वांदो अकादमीतील खेळाडू साऊथ कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज

मुंबई (शांताराम गुडेकर ) मुंबई येथील जयेश ट्रेनिंग क्लासेस तायक्वांदो अकादमीतील साऊथ कोरिया मधील तायक्वांदो वॅान, जेलबोक-दो, मुज्जू या शहरात दि. १८ ते २३ जुलै २०२४ रोजी होणाऱ्या १७ व्या वर्ल्ड तायक्वांदो कल्च्रल एक्सपो आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेसाठी संघ साऊथ कोरिया येथे रवाना झाला असून या संघात जियाना पडीआर, क्रिशवी पांड्या, देवांश पटेल, आर्यव शाह, अहान शाह, अबीर बंसल, वीरजहान असरानी, जहानआरा असरानी आणि सिनीअर वयोगटात चंदन परिडा, स्वप्निल शिंदे, यश दळवी, अमित यादव यांचा समावेश आहे तसेच संघाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जयेश ट्रेनिंग क्लासेस तायक्वांदो अकादमीचे प्रमुख मास्टर जयेश वेल्हाळ आहेत. या स्पर्धेसाठी गेले ३ ते ४ महिने जयेश ट्रेनिंग क्लासेस तायक्वांदो अकादमीच्या जुहू विभागातील प्रशिक्षण केंद्रात दररोज 4-5 तास प्रशिक्षक यश दळवी, चंदन परिडा, स्वप्निल शिंदे, क्रुपेश रणक्षेत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू होता. जयेश ट्रेनिंग क्लासेस तायक्वांदो अकादमीचे खेळाडू जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments