प्रतिनिधी : धारावी येथील काळा किल्ला परिसरात प्राचीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर,खांबदेवनगर मधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे धगधगती मुंबई परिवारातर्फे भाविकांना लाडू,केळी, तुळस वाटप करण्यात आले. त्याचबरोबर पंढरपूरकडे दर्शनाला गेलेल्या हजारो भाविकांना उपवासाचे लाडू देण्यात आले. या सोहळ्यासाठी अनेकांनी सहकार्य केले. यामध्ये श्री संत रोहिदास सेवा मंडळ,काळा किल्ला,श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कमिटी,धारावी,माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ,निपाणी मुंबई या सर्व मंडळातील पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला गृहविभागाचे अवर सचिव नारायण माने, खा.वर्षाताई गायकवाड,नगरसेवक वसंत नकाशे, समाजसेवक मनोहर रायबागे, धारावी पोलीस ठाणेचे वरिष्ठ निरीक्षक राजू बिटकर, विवेक कांबळे,संजय धुमाळ,संतोष लिंबोरे,पत्रकार संजय शिंदे यांच्यासह धगधगती मुंबईची संपूर्ण टीम यांच्या सहकार्याने हा आषाढी एकादशीचा लाडू,केळी,तुळस वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडता आला.
आषाढी एकादशीनिमित्त धगधगती मुंबई परिवारातर्फे भाविकांना लाडू,केळी, तुळस वाटप
RELATED ARTICLES