Tuesday, August 5, 2025
घरमहाराष्ट्रमुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्यावर आयुक्तांनी खुलासा करावा –...

मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील ३५० कोटींच्या टेंडर घोटाळ्यावर आयुक्तांनी खुलासा करावा – अश्रफ आझमी.

मुंबई : मुंबई महानगरपालिका भ्रष्टाचाराची बजबजपुरी झाली असून मर्जीतल्या कंत्राटदारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना सोडले नाही. कंत्राटदार मित्रालाच शिक्षण साहित्याचे टेंडर मिळावे म्हणून सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले तरिही विद्यार्थ्यांना जवळपास ५० टक्के शालेय वस्तू मिळाल्याच नाहीत. शिक्षण खात्यातील साहित्य खरेदीच्या ३५० कोटी रुपयांच्या टेंडर घोटाळ्यावर महापालिका आयुक्त व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, अशी मागणी माजी नगरसेवक अश्रफ यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत बोलताना अश्रफ यांनी बीएमसीच्या शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. ते म्हणाले की, मुंबई महानगर पालिकेच्या शाळेत ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात, या विद्यार्थ्यांना शिक्षणासंदर्भातील विविध २७ वस्तू खरेदी करण्याचे टेंडर मागवण्यात आले पण ही टेंडर प्रक्रिया राबवताना सर्व नियमांना बगल देण्यात आली. १० मे २०२३ मध्ये महापालिकेने एक सर्क्युलर काढून १५ जून २०२३ पासून २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या टेंडरसाठी एसआरएम पद्धत बंद करण्यात येईल असे आदेश जारी करण्यात आले पण १४ जूनला एक दिवस आधी मात्र शिक्षण विभागासाठीच्या २७ वस्तुंचे टेंडर एसआरएम सिस्टिमवर लोड करण्यात आले. हे टेंडर एक महिन्यात पास करणे अपेक्षित होते पण डिसेंबरपर्यंत त्यावर काहीच कार्यवाही केली नाही. डिसेंबर २०२३ मध्ये आणखी एक सर्क्युलर काढण्यात आले आणि सहा महिन्यानंतर हे टेंडर महाटेंडरमध्ये जाऊ शकत नसल्याने या टेंडरला एसआरएममधून परवानगी द्यावी असे सांगण्यात आले. हे टेंडर पास करण्यास एवढा कालावधी का लागला अशी विचारणा बीएमसीच्या अधिकाऱ्यांना केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. शिक्षण साहित्याचे टेंडर जर महाटेंडरमध्ये गेले तर इतर अनेक इच्छुकांनी हे टेंडर भरले असते आणि या सर्वांचा डाव उधळला असता म्हणून मर्जीतल्याच कंत्राटदाराला काम मिळावे यासाठी सर्व आटापिटा करण्यात आला.
एवढे करूनही विद्यार्थ्यांना अनेक वस्तू मिळालेल्या नाहीत. एसआरएम पद्धत बंद केल्यामुळे जीवनाशी निगडीत आरोग्य विभागाचे टेंडर पास होऊ शकले नाही पण शिक्षण विभागाचे टेंडर मात्र पास करण्यात आले. महानगरपालिकेच्या ज्या शाळांची पुनर्विकास करण्यात आला त्यातील अवनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यास बेंचसुद्धा नाहीत. हे विद्यार्थी जमिनीवर बसतात. कोट्यवधी रुपये खर्चूनही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ही अवस्था आहे. या सर्व प्रकारावर बीएमसी व राज्य सरकार यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही अश्रफ यांनी केली.

या पत्रकार परिषदेसाठी माजी नगरसेवक अश्रफ आझमी, मोहसीन हैदर, सुफियान वणू, खजिनदार संदीप शुक्ला, प्रवक्ते युवराज मोहिते, सुरेशचंद्र राजहंस, निझामुद्दीन राईन, महाचिव तुषार गायकवाड, महेंद्र मुणगेकर, कचरू यादव, राजेश इंगळे इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments