प्रतिनिधी : रविवार दिनांक १४ जुलै, २०२४ रोजी कांदाटी विकास संघ, मुंबई यांच्यातर्फे “यशस्वी मार्ग शोधूय व विद्यार्थी गुणगौरव सोहळा” अशा दुहेरी प्रभावशाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या धावत्या इंटरनेटच्या आधुनिक काळात जर आपल्याला टिकायचे असेल तर आपल्याला आपला योग्य मार्ग निवडता आला पाहिजे व उद्याचे भविष्य जर का एकनिष्ठ, एकरूप, एकात्मतेने टिकवून ठेवायचे असेल तर आजचे युवक-विद्यार्थी हे आदर्श यशस्वी घडले पाहिजेत. यासाठी १६ गावं कांदाटी विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवित करून त्यांना करियरची योग्य दिशा ओळखता यावी यासाठी अनुभवाची शिदोरी मध्ये तज्ञ उद्योजक, सामाजिक व शैक्षणिक विकास असे नामांकित यशस्वी व्यक्तिमत्त्व व्याख्याते म्हणून मार्गदर्शक लाभले. कांदाटी खोरे ता. महाबळेश्वर येथील युवक युवती व विध्यार्थी यांचा शैक्षणिक, सामाजिक, संस्कारिक असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री. बबन चव्हाण यांनी भूषवले, तर सूत्र-संचालन प्रदीप कदम आणि महेश शेलार यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या साहाय्याने दीपप्रज्वलन करून कु. साईना हणमंत भोसले (म्हाळुंगे) हिच्या सुमधुर स्वरांतून देशाचे राष्ट्रगीत गायन व पाहुण्यांच्या स्वागतसुमनांनी केली. व त्यानंतर संघाचे सचिव श्री. हणमंत भोसले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे व या कांदाटी विकास संघाबद्दल थोडक्यात प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात अनेक प्रमुख नामांकित अनुभवी व्याख्यातांचा सहभाग होता, ज्यामध्ये मा. श्री. गणेश शिंदे (सर) - YouTube प्रसिध्द व्याख्याते (यशस्वी मार्ग शोधूया), श्री. सुहास खामकर - Mr. Amatuer Olympic, प्रा. डॉ. राजाराम जाधव (सर) - SNDT महिला विद्यापीठ मुंबई (शिक्षण आणि शिक्षण प्रणाली), श्री. सीताराम शेलार - अध्यक्ष पाणी हक्क समिती (शहरांत राहून मूळ गावासोबत आत्मीयता असणे), श्री. लक्ष्मण जाधव - Director जेसन पॉलिमर प्रा. लि. (एक पाऊल उज्वल भविष्याकडे व्यवसाय) व मा. श्री. सीताराम जाधव - Director लक्ष्मी फूड्स ( सूक्ष्म, लघु व मध्यम व्यवसाय) अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा समावेश होता. ज्यांच्याकडून उपस्थित विद्यार्थी पालकवर्ग, समाजबांधव यांना अतिशय मोलाचे व जीवनाला आकार देण्याकरिता उपयुक्त असे प्रभावशाली मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमास विशेष उपस्तिथी म्हणून कोयना संस्थेचे संचालक बी. आर. शेलार, वाई -महाबळेश्वर बाजार समितीचे अध्यक्ष संजयराव मोरे, कांदाटी विकास संघाचे माजी अध्यक्ष श्री मारुतीदादा कदम, माजी खजिनदार श्री यशवंत चव्हाण साहेब, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संजय जाधव, जेष्ट नागरिक चिमाजी शेलार, आर आर चव्हाण, श्री. बबन सखाराम चव्हाण, संघाचे माजी उपाध्यक्ष सखाराम कदम, सुरेश सकपाळ, मा. खजिनदार – यशवंत चव्हाण व अर्जुन चव्हाण या मान्यवरांची उपस्थित लाभली
कार्यक्रम यशस्वी करण्यास संघाचे कार्यकर्ते विकास कदम, भरत चव्हाण, प्रदीप कदम, दगडू शेलार, संतोष कदम, अशोक शिंदे भरत चव्हाण, प्रदीप चव्हाण, योगेश चव्हाण, सुभाष मोरे, मधुकर शेलार, महेश शेलार, विशाल चव्हाण, स्वप्नील चव्हाण या सर्व कार्यकर्त्यांनी उत्तम नियोज केले. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये यशस्वीतेच्या दिशेने प्रोत्साहन देण्यास मोठा हातभार लावला आहे. उपस्थित सर्वांनी आपल्या विचारांची देवाण-घेवाण करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये योगदान दिले. उपस्थित सर्व मान्यवर, व्याख्याते, सामाजिक व्यक्तिमत्त्व, विद्यार्थी- पालक, युवक- समाजबांधव यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली व या कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांनी आर्थिक सहयोग करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व एका परावर्तित संकल्पनेचा लाभ घेतला त्याबद्दल संघाचे खजिनदार श्री. रामचंद्र निवळे यांनी सर्वांचे आभार मानले
.