Thursday, July 31, 2025
घरमनोरंजनकलेचे नंदनवन असणाऱ्या मुंबई रंगमंचावर कोकणातील प्रतिभावंत शाहिरांची ७ ऑगस्ट ला जुगलबंदी

कलेचे नंदनवन असणाऱ्या मुंबई रंगमंचावर कोकणातील प्रतिभावंत शाहिरांची ७ ऑगस्ट ला जुगलबंदी

मुंबई(दिपक कारकर) : कोकणातील पारंपरिक लोककला होळी आणि गणेशोत्सव हे कोकणातील खरे खुरे उत्सव.या दोन्ही उत्सवासाठी येथील शेतकरी मोकळा असतो.भाताची लावणी संपली की घरोघरी गणपती येतात आणि भाताची कापणी /मळणी संपताच शिमग्याचे म्हणजेच होळीचे वेध लागतात.कोकणातील या दोन्ही सणांशी येथील लोककला निगडीत आहेत.
शक्ती-तुरा (जाखडी ) हा सामूहिक नृत्याचा प्रकार आहे.गणेशोत्सवात गावतल्या प्रत्येक वाडीत जाखडीचा संच असतो.आठ गडी फेर धरून वादकांच्या भोवती नाचतात.ढोलकी आणि घुंगरू ही पारंपरिक वाद्य आणि आधुनिक ढंगाची गाणी यांचा मेळ जाखडीत असतो.जाखडीत आता अनेक बदल झालेत.वेशभूषा,प्रकाश योजना,संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची जाखडी वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे.आता जाखडीचा जंगी सामना जणू प्रेक्षकांसाठी पर्वणी असते. कोकणातील लोककला हीच जतन करण्यासाठी आणि रसिक मनोरंजनासाठी प्रथमच रायगड - रत्नागिरी असा दिग्गज शाहिरांचा जंगी मुकाबला होणार आहे.यामध्ये शक्तीवाले शाहीर विजय पायकोळी यांच्याविरुद्ध तुरेवाले शाहिर दिनेश डिंगणकर शक्ती-तुरा रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.रसिक हो आपली उपस्थिती अनमोल असून हा सामना बुधवार दि.०७ ऑगस्ट २०२४, रोजी रात्रौ ८.३० वा.मा.दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह,विले पार्ले, पूर्व ( मुंबई )येथे होणार आहे.या सामन्याचे आयोजन श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) यांनी केले असून अधिक माहितीसाठी किंवा तिकीटसाठी ९९३०५८५१५३ / ९८३३६८९६४२ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments