कराड( प्रतिनिधी ) येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाच्या २०२४-२५ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी विनायक देसाई यांची निवड तर उपाध्यक्षपदी रोहित शेवाळे यांची निवड करण्यात आली,तर सन २०२३-२४ ची उत्सव समिती ही प्रमुख सल्लागार पदी कार्यरत राहील तर मंडळाचे कार्यकारी संचालक मंडळ हे कार्यवाहक म्हणून काम पाहिल असा ठराव करण्यात आला , येवती येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये गणेश मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या झालेल्या मीटिंगमध्ये सदर निवडी करण्यात आल्या ,यावेळी मीटिंग चे अध्यक्ष शशिकांत शेवाळे हे होते,तर सन 2023/24 चे उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक शेठ लोखंडे यांनी प्रस्ताव मांडला की,दरवर्षी आपण उत्सव समिती ची कमिटी वेगळी करून यामध्ये जास्तीत जास्त नवनिर्वाचित तरुणांना संधी दिली पाहिजे,सर्वांनी एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करूया याच उद्देशाने आपण उत्सव समितीची स्थापना केली आहे, हा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्वांनी या प्रस्तावाला एक मताने मंजूरी दिली,या मीटिंगमध्ये आगमन सोहळा सायंकाळी ठीक सहा वाजता संपवला जाईल तर विसर्जन मिरवणूक नऊ वाजता संपवुन बप्पाचे विसर्जन केले जाईल,असे ठरवण्यात आले ,गेल्या ३१ वर्षापासून एक गाव एक गणपतीचे परंपरा असणारे मंडळ यंदाचे हे ३२ वे वर्ष आहे ,सन २०२४ ची उत्सव समिती पुढील प्रमाणे ,संदीप देसाई, शिवाजी शेवाळे, मारुती शेवाळे, इंद्रजीत खोचरे ,करण शेवाळे, संकेत शेवाळे , आशितोष शेवाळे संदेश पवार ,आर्यन शेवाळे ,विकास सूर्यवंशी सुरज सूर्यवंशी, आमित सूर्यवंशी ,आकाश शेवाळे, जयवंत सोनवणे ,आर्यन साठे ,सागर साठे,तर मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे याची निवड करण्यात आली ….
