मुंबई (शांताराम गुडेकर ) १३ जुलै रोजी आंबेडकर भवन, पास्ता रोड, दादर येथे मुंबई जिल्ह्याची १३ वी क्युरोगी आणि ५ वी पुमसे तायक्वांदो स्पर्धा पार पडली.या स्पर्धेमध्ये मुंबई जिल्ह्यातील विविध विभागातून १२ संस्थे मार्फत ५०० हून अधिक खेळाडूंनी क्युरोगि आणि पुमसे या प्रकारात सहभाग घेतला.आंतरराष्ट्रिय प्रशिक्षक आणि पंच मास्टर जयेश वेल्हाळ यांच्या मार्गर्शनाखाली सहाय्यक प्रशिक्षक निशांत शिंदे , विनीत सावंत आणि प्रणय मुलकी, यश दळवी, विक्रांत देसाई, कृपेश रानक्षेत्रे, फ्रँक कानाडिया, यांच्या परिक्षणा खाली गेले दोन ते तीन महिने प्रशिक्षण केंद्रात दररोज दोन ते तीन तास सराव करत होते तसेच या संस्थेने या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग करत संस्थेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून पुमसे या प्रकारात २९ सुवर्णपदक, १७ रौप्य पदक, १३ कांस्यपदकांची कमाई केली. क्युरोगी या प्रकारात १० सुवर्णपदक, ९ रौप्य, १५ पदक कांस्यपदकांची कमाई करून संपूर्ण मुंबई जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला.प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी सर्व प्रशिक्षकांचे या उत्तम कामगिरीसाठी कौतुक करत संस्थेतील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंची सुवर्ण , कांस्य आणि रौप्य पदकाची कमाई
RELATED ARTICLES