प्रतिनिधी : कला क्रीडा सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आर्यन फ्रेंड्स फाऊंडेशनच्या वतीने तिमिरातून तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन वडवळ येथील श्री शिव छत्रपती सभागृहात करण्यात आले होते या समयी शंभरहुन अधिक विद्यार्थी उपस्थित होते. सत्यवान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवादक अधिकारी सीमाशुल्क विभाग मुंबई (भारत सरकार)यांचे मोलाचे आणि आजच्या पिढीला दिशादर्शक असे स्पर्धा परीक्षा आणि शासकीय सेवेत जाण्यासाठी कोणती पदे असतात त्यासाठी कोणत्या परिक्षा द्याव्या त्याची तयारी कशी करावी या साठीचे बहुमूल्य मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आले. ग्रामीण भागातील मुलांना अश्या प्रकारचे मार्गदर्शन पहिल्यांदाच होत असल्याने विद्यार्थी,पालक तसेच उपस्थित मान्यवरांनी आर्यन्स फ्रेंडस फाऊंडेशन चे अध्यक्ष रायगड भूषण जगदीश मरागजे तसेच कार्यकारिणी पदाधिकारी महेंद्र सावंत, सुधीर मुसळे,प्रमोद सावंत, प्रवीण सावंत,मंगेश सावंत,सागर मोरे तसेच उपक्रम प्रमुख सचिन जाधव यांचे कौतुक केले. या प्रसंगी अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे वडवळ ग्रामपंचायतीचे सरपंच ज्ञानेश्वर सुतार, उप सरपंच श्यामकांत सावंत .एम डी चाळके, जितेंद्र सकपाळ, विष्णू सावंत,सुरेश चाळके तसेच ग्राम पंचायत सदस्य संजय कदम,जगदीश मरागजे, ग्राम सेवक प्रमोद पाटील मुख्याध्यापिका सौ वैशाली गोळे,राजिप शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर थळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी आणि पालकांनी या मार्गदर्शन कार्यक्रमातुन मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे तसेच ते भविष्यात उपयोगी ठरेल आणि आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू अशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत वडवळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या मार्गदर्शन कार्यक्रमाची आवश्यकता लक्ष्यात घेता संस्थेचे अध्यक्ष जगदीश मरागजे यांनी वर्षभरात किमान १० कार्यक्रम घेण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थी मित्रांना शैक्षणिक वस्तूं भेट स्वरूपात देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
आर्यन फ्रेंड्स फाऊंडेशनच्या वतीने तिमिरातूनी तेजाकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
RELATED ARTICLES