Sunday, December 15, 2024
घरआरोग्यविषयकमुंबईत तापमान वाढणार, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

मुंबईत तापमान वाढणार, नागरिकांनी काळजी घेण्याची गरज

प्रतिनिधी : मुंबईत  कमाल तापमान 40 अंशांवर जाण्याचा अंदाज असून या दरम्यान आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज ‘मुंबई रेन’ या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे. रविवारपासून पुढील 48 तासांसाठी एसएसआर परिसरात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतील किमान तापमानात ही वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.  कल्याणमधील तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. तर ठाणे,पालघर परिसरातील कमाल तापमान देखील 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे. 
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून समुद्राकडून सुटलेल्या वाऱ्यांमुळे कमाल तापमानात घट झाली होती. मुंबईतील कमान तापमान ही 37-38 वरून 32-33 अंशांर्यंत खाली आले होते. रात्रीही गारवा जाणवत होता. शनिवारच्या ढगाळ वातावरणानंतर आणखी उष्णता अपेक्षित आहे.

सोमवार आणि मंगळवार असे पुढील २ दिवस उष्णतेची तीव्रता अधिक असेल. बुधवारपासून कमाल तापमानात घसरण होण्याचा अंदाज आहे. यामुळे थोडासा दिलासा मिळेल. रविवारी सांताक्रूझ येथे 34.5 तर कुलाबा येथे 31.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. मुंबई महानगर प्रदेश परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज ‘मुंबई रेन’ या वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेकडून व्यक्त करण्यात आला आहे.  देशभरातील विविध राज्यांमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस गडगडाटी वादळांसह कोसळू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन तीन दिवसात तापमान वाढणार असल्यामुळे मुंबईसह ठाणे,कल्याण,पालघर येथील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments