प्रतिनिधी : महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट गेल्या २७ वर्षापासून धारावीसारख्या झोपड- पट्टीत कष्टकरी, गोरगरीब व बहुजनांच्या विदयार्थ्यासाठी प्राथमिक ते महाविदयालयापर्यंत ज्ञानदानाचे कार्य करन असून नुसत्या पुस्तकी ज्ञानापेक्षा बदलत्या जगाबरोबर विदयार्थ्यानी स्पर्धा करावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून व्यावसायिक शिक्षणही देण्याचा प्रयत्त्न करत असून यावर्षीपासून विदयार्थ्यासाठी संस्थेने फन फस्ट ग्लोबल स्किलर या व्यावसायिक शिक्षण देणाच्या संस्थेला सोबत घेऊन हुनर प्रशिक्षण २०२४ या प्रशिक्षण वर्गाची सुरुवात केली असून हे प्रशिक्षण वर्ग मनोहर जोशी महाविदयालय पी.एम.जी.पी कॉलनी, धारावी, मुंबई-४०००१७ येथे दररोज चालविले जाणार असून नाव नोंदणीसाठी वासिम शेख-7021675626 व 9867633355 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
या व्यावसायिक प्रशिक्षण वर्गात AC व फ्रीज यांचे Repairing, Installation आणि Servicing प्रशिक्षित प्रशिक्षकांकडून देण्यात येणार असून त्याबरोबरच व्यक्तिमत्त्व प्रशिक्षण वर्गही तसेच माहिती तंत्रज्ञानाचे मुलभूत शिक्षणही दिले जाणार आहे.
प्रशिक्षण कालावधी 3 महिन्यांचा असून त्यानंतर प्रत्यक्ष फिल्ड वर्क कामाचा १५ दिवसाचा अनुभव ही दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची ही हमी उपरोक्त संस्थेमार्फत दिली जाणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग पूर्णपणे विनामुल्य असून प्रशिक्षणार्थी १० वी पास अथवा नापास असले तरी सुधा या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेऊन प्रशिक्षिन होऊन आपला व्यवसाय अथवा नोकरी चालू करू शकतात. त्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यानी या विनामूल्य प्रशिक्षण वर्गाचा लाभ घ्यावा व नाव नोंदणी बहुसंख्येने करावी असे आवाहन महात्मा फूले एज्युकेशन ट्रस्टचे विश्वल प्रमोद बाबूराव माने यांनी केले आहे.
